PHOTOS

'तू दाखवून दिलंस…' सचिन- सुप्रियाचा लेक श्रियासाठी खास मेसेज, म्हणाले...

नेटफ्लिक्सवर नुकतीच प्रदर्शित झालेल्या वेबसीरिजमध्ये श्रिया पिळगावकरच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या भूमिकेवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, अभिमानाने भारावलेल्या वडिलांनी म्हणजेच सचिन पिळगावकर यांनी आपल्या मुलीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलं आहे, पाहूया सविस्तर.

Advertisement
1/9

Shriya Pilgaonkar: सचिन पिळगावकर यांनी आपली मुलगी श्रिया पिळगावकरच्या अभिनयाचं खास कौतुक सोशल मीडियावर केलं आहे. सुप्रसिद्ध मराठी कलाकार सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांनी आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. त्यांच्या घराण्याचा अभिनयाचा वारसा पुढे नेत श्रियानेही अभिनयक्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 

2/9

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या नेटफ्लिक्सवरील 'मंडला मर्डर्स' या वेबसीरिजमध्ये श्रियाने साकारलेली 'रुक्मिणी' ही भूमिका चर्चेत आली आहे. या भूमिकेमुळे तिच्या अभिनयातील परिपक्वता आणि वेगळेपणा ठळकपणे समोर आला आहे.

3/9

सचिन यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत श्रियाच्या कामाबद्दल लिहिलं , 'श्रिया, तुला मिळत असलेल्या प्रेमासाठी अभिनंदन! तू साकारलेल्या प्रत्येक भूमिकेतून तुझी क्षमता स्पष्टपणे दिसते. आम्हाला तुझ्या कामाचा अभिमान वाटतो. 'मंडला मर्डर्स'मध्ये तू साकारलेली रुक्मिणीची भूमिका तुझ्या आधीच्या भूमिकांपेक्षा वेगळी आणि लक्षवेधी आहे.'

4/9

सचिन पुढे म्हणाले,  'तू सिद्ध केलंस की, फक्त काही दृश्यांमधूनसुद्धा कलाकार प्रेक्षकांच्या मनात कशी छाप सोडू शकते.' या पोस्टसोबत सचिन यांनी सुप्रिया पिळगांवकरसोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत, ज्यातून त्यांच्या दोघांच्या अभिमानाची झलक दिसते.

5/9
मंडला मर्डर्समध्ये श्रियाची झलक
मंडला मर्डर्समध्ये श्रियाची झलक

'मंडला मर्डर्स'मधील रुक्मिणी या भूमिकेला कथानकात मर्यादित स्क्रीन टाइम असली तरी ती प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवून जाते. तिच्या अनोख्या भूमिकेत तिने आणलेले बारकावे, परिपक्वता आणि उर्जा प्रेक्षकांना भुरळ घालतात.

6/9

या शोच्या प्रस्तावनेत दाखवलेल्या 1950 च्या दशकातील सीन्समधून तिचं पात्र विशेष उठून दिसतं. पंथनेत्याच्या भूमिकेत तिने साकारलेलं गूढ आणि आव्हानात्मक पात्र प्रेक्षकांवर परिणाम करून जातं.

7/9

प्रेक्षकांकडूनही श्रियाच्या या भूमिकेला प्रचंड प्रेम मिळत आहे. सोशल मीडियावर तिच्या लूकचं, अभिनयाचं आणि निवडलेल्या वेगळ्या पात्राचं कौतुक होत आहे.

8/9
श्रिया पिळगावकरचा प्रवास
श्रिया पिळगावकरचा प्रवास

श्रिया पिळगावकरने आपल्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपटातून केली आणि नंतर हिंदी तसेच वेबसीरिजच्या माध्यमातून आपली ओळख तयार केली. 'फॅन', 'भांगडा पा ले', 'हाथी मेरे साथी' अशा बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिच्या भूमिका विशेष ठरल्या. तसेच 'मिर्झापूर', 'गिल्टी माइंड्ज', 'द ब्रोकन न्यूज', 'ताजा खबर' यांसारख्या वेबसीरिजमधील तिचा अभिनयही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

 

9/9

श्रिया फक्त अभिनयापुरती मर्यादित नाही, तर तिने काही शॉर्ट फिल्म्सचं दिग्दर्शनही केलं आहे. तिची ही बहुमुखी प्रतिभा प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनाही भावली आहे.

 





Read More