PHOTOS

Cricketers Lovestory : सचिन - अंजलीच्या लग्नाला 30 वर्ष पूर्ण! 6 वर्षांनी मोठ्या अंजलीच्या प्रेमात कसा पडला सचिन तेंडुलकर?

Sachin - Anjali Lovestory : भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी डॉ अंजली यांच्या लग्नाला 26 मे रोजी 30 वर्ष पूर्ण झाली. त्यांची लेक सारा तेंडुलकर हिने सोशल मीडियावर सचिन - अंजलीच्या 30 व्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले. तेव्हा सचिन आणि अंजली यांच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेऊयात. 

Advertisement
1/8

सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांची लव्ह स्टोरी एखाद्या बॉलिवूड चित्रपटाच्या स्टोरी सारखी आहे. सचिन आणि अंजलीची पहिली भेट एअरपोर्टवर झाली होती. त्यावेळी सचिन इंग्लंडवरून परत येत होता, तर अंजली तिच्या आईला रिसिव्ह करण्यासाठी तेथे आली होती. 

 

2/8

दोघेही पहिल्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडले. अंजली एक मेडिकल विद्यार्थी होती आणि तिच्या अभ्यासामध्ये खूप व्यस्त होती. या कारणास्तव, अंजलीला क्रिकेटबद्दल काहीच माहिती नव्हते. सचिन तेंडुलकर त्याच्या आयुष्यात आल्यानंतर अंजलीने क्रिकेटमध्ये रस घेण्यास सुरुवात केली. 

 

3/8

सचिन तेंडुलकर आणि अंजली यांनी एकमेकांना 5 वर्ष डेट केलं आणि त्यानंतर ते दोघे लग्नबंधनात अडकले. 24 मे 1995 मध्ये दोघांचा विवाह झाला. 

4/8

12 ऑक्टोबर 1997 रोजी सचिन आणि अंजलीची मुलगी सारा चा जन्म झाला. तर 24 सप्टेंबर 1999 मध्ये अर्जुन तेंदुलकरचा जन्म झाला. 

5/8

सारा तेंडुलकरने अंजली आणि सचिनच्या 30 व्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले. लग्नाच्या वाढदिवसासाठी सचिनचे मुंबईचे घर हे फुलांनी सजवण्यात आलं होतं. तर अंजलीने खास मेहंदी सुद्धा काढली होती. 

 

6/8

सचिन तेंडुलकरने 16 नोव्हेंबर 2013 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सचिन तेंडुलकर भारतासाठी क्रिकेट खेळण्याकरता आंतरराष्ट्रीय टूरवर असायचा तेव्हा पत्नी अंजलीने त्याच्या कुटुंबाची काळजी घेतली होती. 

 

7/8

सचिन तब्बल  24 वर्ष सचिन भारतासाठी क्रिकेट खेळला. सचिनने त्याच्या कारकिर्दीत भारतासाठी एकूण 200 टेस्ट, 463 वनडे, 1 टी 20 आणि 78 आयपीएल सामने खेळले आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने 15921, वनडेत 18426 तर आयपीएलमध्ये 2334 धावा केल्या. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतक ठोकली आहेत. 

 

8/8

सचिनचा जन्म महाराष्ट्रातील मुंबई येथील अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. सचिन तेंडुलकरने 2007 मध्ये मुंबईतील बांद्रा वेस्टमध्ये पेरी क्रॉस रोडवरील बंगला खरेदी केला. सचिन त्याच्या कुटुंबासोबत सध्या याच घरात राहतोय.

 





Read More