सई ताम्हणकर नेहमी तिच्या हॉट आणि बोल्ड लुकने सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेत्रीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
सई ताम्हणकरने गेल्यावर्षी मुंबईत आलिशान घरं घेतलं आहे. तिचे हे नवीन घर मालाड परिसरात असून ते 45 व्या मजल्यावर आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकरे दिवाळी पहाटच्या दिवशी तिच्या मुंबईतील घरी खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये तिने गेल्यावर्षी आपल्या घरी मित्र-मैत्रिणींना दिवाळी पहाट साजरी करण्यासाठी बोलावले होते.
यावर्षी देखील सई ताम्हणकरची आई मृणालिनी ताम्हणकर यांनी दिवाळी पहाटच्या दिवशी उपस्थिती दाखवली होती.
सईने दिवाळी पहाटच्या दिवशीचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. आईसोबत या फोटोमध्ये सई ताम्हणकरचे मित्र-मैत्रिणी देखील आहेत.
या दिवाळी पहाटला सई ताम्हणकरच्या घरी 'मानवत मर्डर्स'ची संपूर्ण टीमने उपस्थिती दर्शवली होती. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.