अभिनेत्री सई ताम्हणकरचा गुलाबी साडीमध्ये हटके अंदाज. चित्रपटासाठी केलेल्या लुकची चाहत्यांमध्ये चर्चा.
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज झाली आहे.
लवकरच ती 'ग्राउंड झीरो' या चित्रपटात थेट अभिनेता इमरान हाश्मीसोबत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
बॉक्स ऑफिसवर पहिल्यांदाच सई ताम्हणकर ही इमरान हाश्मीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतीच ती गुलाबी साडी नेसून चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला पोहोचली.
गुलाबी साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. या साडीवर सुंदर नक्षीकाम आणि मॅचिंग ब्लाऊज तिने परिधान केला होता. त्यासोबत तिने केस मोकळे सोडले होते.
सई ताम्हणकरचा ट्रेलर लाँच सोहळ्याचा साडी लूक पाहून चाहते देखील घायाळ झाले. यावेळी तिने इमरान हाश्मीसोबत पोज देताना दिसली.
या चित्रपटात इमरान हाश्मी बीएएसएफ जवान नरेंद्र दुबे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट 25 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सईचा हा चित्रपट पाहण्यासाठी तिचे चाहते देखील आता खूप उत्सुक झाले आहेत. सोशल मीडियावर तिच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.