ouse Latest Photos: बॉलिवूडचा नवाब अशी ओळख असणाऱ्या अभिनेता सैफ अली खान याच्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत ...
Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे इथल्या राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती मिळतेय. मध्यरात्रीच्या सुमारास हा चाकू हल्ला झाला. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या अज्ञाताने चाकू हल्ला केल्याची माहिती मिळतेय. सध्या सैफ अली खान लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले, तर दुसरीकडे वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपासाला वेग मिळाला आहे.
दरम्यान, सैफवर हल्ला झालेला असतानाच त्याच्या घराचे फोटो पाहण्याच्या दिशेनं नेटकऱ्यांनी इंटरनेटवर त्यांचा मोर्चा वळवल्याचं पाहायला मिळत आहे.
सैफ आणि त्याची पत्नी दोन मुलांसह मुंबईतील वांद्रे इथं असणाऱ्या त्यांच्या आलिशान घरात राहतात. त्यांचं हे घर जणून एखाद्या भव्य महालाचा एखादा सुरेख आणि लक्षवेधी मजलाच भासतं.
जानेवारी 2021 मध्ये ही जोडी या नव्या घरात वास्तव्यास आल्याचं सांगितलं जातं, Satguru Sharan building complex मधील त्याच्या या आलिशान घराची किंमत साधारण 50 ते 80 कोटींदरम्यान असल्याचं म्हटलं जातं. या संकुलातील घरांची किंमत 10 कोटी रुपयांपासून सुरू होत असल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या या घरातील बाल्कनी कायमच काही सेलिब्रिटींसह खुद्द सैफच्या मुलांच्या सोशल मीडिया पोस्टमध्येही पाहायला मिळाली आहे.
सैफ आणि करीनाच्या मुंबईतील या घरामध्ये अनेक पारंपरिक गोष्टींना मॉडर्न लूक देत त्या माध्यमातून घराची सजावट करण्यात आली आहे.
मोठमोठे नक्षीकाम असणारे गालिचे, जुनं फर्निचर, पुस्तकांची खोली आणि त्यात असणारी शेकडो पुस्तकं... असा एकंदर माहोलच या सेलिब्रिटी जोडीच्या घरात पाहायला मिळत आहे.
हाऊस पार्टी असो किंवा मग एखादा सणवार... घरातील कोणा सदस्याचा वाढदिवस... सैफ आणि करीनाच्या या घरात अनेकदा पार्टीचं आयोजन केलं जातं.
गार्डन, स्विमिंग पूल, लायब्ररी, आलिशान लिविंग रुमही असणाऱ्या सैफच्या या घराची चर्चा बी टाऊनमध्ये कायमच पाहायला मिळते. (सर्व छायाचित्र/ इन्स्टाग्राम)