PHOTOS

PHOTO : 12 वर्ष मोठ्या अभिनेत्रीशी लग्न, 13 वर्षांनंतर घटस्फोट; पुन्हा 10 वर्ष लहान हिरोईशी विवाह, 4 मुलांच्या सुपरस्टार वडिलांना ओळखलं का?

ारा हा चिमुकला आज चार मुलांचा बाप आणि सुपरस्टार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि श्रीमंत कुटुंबातील या अभिनेत्य...

Advertisement
1/10

तीन दशकापासून तो बॉलिवूडमध्ये सक्रीय असणारा हा अभिनेता आहे, सैफ अली खान. गुरुवारी मध्यरात्री 2 वाजता राहत्या घरात सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. ज्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला. त्याचावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु असून ऑपरेशननंतर आता त्याची प्रकृती ठिक असल्याच डॉक्टरांनी सांगितलंय.

2/10

आई शर्मिला टागोर या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असल्याने सैफला अभिनयाची आवड लहानपणापासून होती. आई बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री असल्याने साहजिकच त्याचाकडून दिर्ग्दशकांना खूप अपेक्षा होत्या. पण पहिला चित्रपटात अभिनय आणि डान्स त्याला करता आला नाही अशी टीका झाली. 

3/10

सैफ अली खानचा जन्म 16 ऑगस्ट 1970 रोजी नवी दिल्लीमध्ये झाला. आज अभिनयासाठी ओळखला जाणारा सैफला पहिल्या चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होतं. 

4/10

हा चित्रपट होता 1991 मध्ये दिग्दर्शक राहुल रवैल यांचा बेखुदी. या चित्रपटासाठी सैफला मुख्य अभिनेता म्हणून साइन करण्यात आलं होतं. सैफच्या जोडीला काजोल या चित्रपटात दिसणार होती. पण सैफचा अभिनय पाहून राहुल नाराज झाला आणि त्याने सैफला चित्रपटातून काढून टाकले. 

5/10

1993 मध्ये यश चोप्रा यांच्या 'परंपरा' चित्रपटातून सैफने डेब्यू केला पण त्याला अभिनेत्याचा दर्जा मिळाला नाही. पण आज सैफने बॉलिवूडमध्ये क्राईम ड्रामा, अॅक्शन थ्रिलर, कॉमिक आणि रोमान्सचा बादशाह म्हणून आपली ओळख निर्माण केलीय. 

6/10

एवढंच नाही तर त्याचा अभिनयासाठी सैफला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सात फिल्मफेअर आणि पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलंय. अनेकांना सैफ अली खानचे खरं नाव आजही माहिती नाही. आम्ही तुम्हाला सांगतो त्याच खरं नाव सैफ साजिद अली खान असं आहे. चित्रपटसृष्टीत आल्यावर त्याने नाव बदलले. 

7/10

सैफ अली खानने दोन लग्न झाले आहेत. पहिलं लग्न अमृता सिंगसोबत झालं होतं. बॉलिवूडमध्ये आल्यावर अमृताशी ओळख, मग मैत्री आणि प्रेम. प्रेमात वयाची मर्यादा नसते हेच या दोघांनी सिद्ध केलं. 12 वर्ष मोठ्या अमृताशी सैफने 1991 मध्ये लग्न केलं. या दोघांची मुलगी सारा अली खान एक सुपरस्टार तर मुलगा इब्राहिम अली खानसुद्धा सिनेसृष्टीत नशीब आजमावतोय. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 13 वर्षांनी त्या दोघांनी घटस्फोट घेतला. 

8/10

त्यानंतर बराच काळ सिंगल असणाऱ्या सैफच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री झाली. यावेळी सैफपेक्षा 10 वर्ष लहान करीना कपूरचा प्रेमात सैफ पडला. 5 वर्षे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 16  ऑक्टोबर 2012 त्यांनी लग्न करुन सर्वांना आश्चर्यचकित केलं. त्यांना तैमूर आणि जहांगीर अशी दोन मुलं आहेत. 

9/10

सैफ अली खानबद्दल एक गोष्ट कायम गुगलवर सर्च करण्यात येते ती म्हणजे त्याचा संबंध मुघलांशी आहे का? तर आम्ही तुम्हाला सांगतो की, 1946 मध्ये इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी खेळलेले इफ्तिखार अली खान पतौडी आणि भोपाळच्या नवाब बेगम साजिदा सुलतान यांचं सैफ अली खान नातू आहेत. भोपाळचे शेवटचे शासक नवाब हमीदुल्ला खान हे त्यांचे पणजोबा होते आणि क्रिकेटपटू साद बिन जंग हे त्यांचे पहिले चुलत भाऊ होते. 

10/10

सैफ अली खान हा पतौडी घराण्याचा 10 वा नवाब असून पतौडीचं आलिशान महल हे 800 कोटींचा घरात आहे. या महलात 150 खोल्या आहेत. सैफ अली खानच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची एकूण संपत्ती 150 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 1120 कोटी रुपये आहे. अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत त्यांची संपत्ती 70 टक्क्यांनी वाढली आहे.





Read More