Saif Ali Khan Meet Auto Rickshaw Driver: सैफ अली खानवर हल्ला झाल्याच्या दिवसापासून हा रिक्षाचालक चांगलाच चर्चेत आहे. असं असतानाच आता या रिक्षाचालकाचे सैफबरोबरचे फोटो समोर आले आहेत. या दोघांमधील चर्चेचा तपशीलही समोर आला आहे.
अभिनेता सैफ अली खानने त्या रिक्षाचालकाला काय शब्द दिलाय आहे जाणून घ्या. या दोघांनी लिलावतीमध्ये सैफला डिस्चार्ज मिळतानाच भेट घेतली. या भेटीत दोघांनी काय चर्चा केली जाणून घ्या.
अभिनेता सैफ अली खान लिलावती रुग्णालयामध्ये पाच दिवस उपचार घेतल्यानंतर मंगळवारी घरी परतला.
16 जानेवारीला सैफवर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यामधून थोडक्यात बाचवलेल्या सैफने रुग्णालय सोडण्याआधी एका खास व्यक्तीची भेट घेतली.
16 जानेवारीच्या रात्री रक्तबंबाळ अवस्थेत सैफ अली खान त्याच्या घराखाली आला तेव्हा त्याला जो रिक्षाचलक भजन सिंग राणा रुग्णालयात घेऊन गेला त्याचीच सैफने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताना भेट घेतली.
आयएएनएस या वृत्तसंस्थेनं या भेटीचे फोटो आणि भेटीत या दोघांमध्ये काय बोलणं झालं याबद्दलची माहिती दिली आहे. सैफने मदतीच्या क्षणी धावून आलेल्या या रिक्षाचालाचे आभार मानले.
विशेष म्हणजे सैफ अली खानबरोबरच त्याची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनीही भजन सिंग राणाची भेट घेतली. या दोघांच्या भेटीचे रुग्णालयातील फोटो समोर आले आहेत.
शर्मिला टागोर यांनी तुमच्याकडून अशाचप्रकारे गरजुंची मदत होवो, असं म्हणत भजन सिंग राणा या रिक्षाचालकाचे आभार मानले. यापूर्वीच या रिक्षाचलकाला एका संस्थेनं 11 हजारांचं बक्षीस देऊन गौरव केला आहे.
यावेळेस सैफ अली खानने भजन सिंग राणा यांना 16 तारखेच्या रात्री न दिलेलं भाडं मी नक्की देईन असं सांगितलं. अगदी गळ्यात गळे घालून दोघांनी सैफला डिस्चार्ज मिळण्याआधी हॉस्पीटलमध्ये गप्पा मारल्या.
तसेच भजन सिंग राणाला काहीही मदत लागल्यास आपण ती करण्यास तयार असल्याचंही सैफ अली खानने सांगितलं, असं आयएएनएसने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.