Saina Nehwal Net Worth: सायनाने अचानक तिच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर घटस्फोटाची पोस्ट केल्याने तिची इंटरनेवटर चर्चा आहे. असं असतानाच आता तिची नेमकी संपत्ती किती याबद्दलही इंटरनेटवर शोधलं जात आहे. सायना खरोखर किती श्रीमंत आहे? ती वर्षाला किती पैसे कमवते? पाहूयात...
सायना नेहवाल नेमकी किती श्रीमंत आहे? तिचं आलिशान घर कुठे आहे? ते कितीचं आहे? तिच्याकडे कोणत्या कार्स आहेत? ती कोणत्या माध्यमातून पैसे कमवते जाणून घ्या सविस्तरपणे...
भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि तिचा पती पारूपल्ली कश्यप वेगळे होणार आहे. दोघेही घटस्फोट घेत असल्याची माहिती स्वत: सायनाने दिली आहे. सायनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रविवारी रात्री उशीरा एक स्टोरी शेअर करत आपण विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. सायनाच्या घटस्फोटानंतर तिच्या संपत्तीचीही जोरदार चर्चा आहे.
भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू असलेल्या सायनाने 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकावर नाव कोरलं. तेव्हापासूनच ती प्रकाशझोतात आली. खरं तर सायना नेहवाल आणि पारूपल्ली कश्यप हे मागील फार वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांच्या या ओळखीचं रुपांतर नंतर मैत्रीत आणि मग प्रेमात झालं.
सायना आणि कश्यप या दोघांची पहिली भेट हैदराबादमधील दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीत झाली, जिथे दोघेही प्रशिक्षण घेत होते. इथूनच त्यांची प्रेमकथा आकार घेऊ लागली. 2018 मध्ये लग्नबंधनात अडकल्यानंतर आता सात वर्षांनी दोघेही विभक्त होत आहेत.
विशेष म्हणजे सायना आणि कश्यप यांचं लव्ह मॅरेज होतं. दोघेही एक दशक एकमेकांना डेट करत होते. दोघे 14 डिसेंबर 2018 रोजी विवाहबंधनात अडकले. मात्र लग्नाला सात वर्ष पूर्ण होण्याच्या आतच ते विभक्त होत असल्याची घोषणा सायनाने केली आहे.
सायना नेहवालने रविवारी रात्री उशीरा इन्स्टाग्रामवर अचानक घटस्फोट घेत असल्याची पोस्ट शेअर करत सर्वच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. "कधी कधी आयुष्य आपल्याला वेगळ्या वळणावर घेऊन जातं. बराच विचार केल्यानंतर कश्यप पारूपल्ली आणि मी आता वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघेही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी स्थैर्य, यशस्वी आणि शांततापूर्ण जीवन जगण्यास प्राधान्य देत आहोत. या प्रवासात पुढे जाताना मी त्याचं चांगलं व्हावं म्हणून शुभेच्छा देत सर्व छान आठवणींसाठी त्याचे आभार मानते," असं सायनाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"या कठीण काळामध्ये तुम्ही आमच्या खासगीपणाचं भान आणि सन्मान ठेवाल अशी अपेक्षा बाळगते," असंही सायनाने पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे. सायनाची एकूण संपत्ती किती आहे ती
सायना नेहवाल ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी बॅटमिंटनपटू आहे. सायनाची कमाई बॅटमिंटन स्पर्धेतील पुरस्काराची रक्कम, ब्रॅण्ड एण्डोर्समेंट, जाहिरात आणि खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून होते.
सायनाने 'नारिक' नावाच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. ही कंपनी महिलांच्या मासिक पाळीसंदर्भातील उत्पादनांच्या क्षेत्रात काम करते. ही कंपनी पर्यावरणपूरक आणि पुन्हा वापरता येतील असे सॅनिटरी पॅड्स बनवतात.
सायनाचा जन्म हरियाणामधील हिसारमध्ये झाला. मात्र ती लहानपणापासून हैदराबादमध्येच वास्तव्यास आहे. हैदराबादमध्ये तिने 2015 मध्ये आलिशान घर विकत घेतलं आहे. हे घर पाच कोटी रुपयांचं असल्याचं सांगितलं जातं.
सायनाला लक्झरी कार्सची आवड आहे. तिच्याकडे अनेक महाग गाड्या आहेत. ज्यामध्ये मर्सिडीज एएमजी जीएलई 63 चा समावेश आहे. 2023 मध्ये तिने ही कार विकत घेतली. ही कार 2 कोटी रुपयांची आहे.
सायनाकडे मिनी कूपर सुद्धा आहे. ही कार 40 ते 50 लाखांची आहे. सायनाकडे याशिवाय 50 लाखांची बीएमडब्यू आणि मर्सिडीज बेन्झसारख्या गाड्याही आहेत.
सायना नेहवालची वर्षिक कमाई 5 कोटी रुपये इतकी आहे. ती दरवर्षी पाच कोटी रुपयांची कमाई करते.
सायनाची एकूण संपत्ती 36 कोटी रुपये इतकी आहे. सायना एका आलीशान घरात राहते. तिच्याकडे अनेक चारचाकी आहेत.