PHOTOS

भारताची बॅडमिंटन क्वीन आहे कोटींची मालकीण, सायना नेहवालचे 5 कोटींचे घर आलिशान पहिले का? बघा Inside Photos

Saina Nehwal’s Hyderabad luxurious House: अलिकडेच भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करून तिचा पती पारुपल्ली कश्यपपासून विभक्त झाल्याची माहिती दिली आहे.

 

Advertisement
1/8

स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत आली आहे. तिच्या अनेक गोष्टींबद्दल नेहमीच चर्चा होत असतात. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करून तिचा पती पारुपल्ली कश्यपपासून विभक्त झाल्याची माहिती दिली आहे. 

 

2/8

सायना ही ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी भारतातील पहिली बॅडमिंटन खेळाडू आहे. इतकेच नाही तर ती जगातील तिसरी सर्वाधिक कमाई करणारी महिला बॅडमिंटन खेळाडू आहे.

 

3/8

काही ​मीडिया रिपोर्ट्सनुसार, सायना नेहवाल ही कोटींची मालकीण असून तिची एकूण संपत्ती सुमारे ३६ कोटी रुपये आहे. तिने २०१५ मध्ये हैदराबादमध्ये एक आलिशान घर खरेदी केले. त्याची किंमत सुमारे ५ कोटी रुपये आहे. 

 

4/8

सायनाच्या घर फार सुंदर असून त्यात  सर्व आलिशान सुविधा आहेत. एका थीममध्ये तीच घर सजलेलं आहे. चला आज आम्ही तिच्या घरातील आतले फोटोज दाखवणार आहोत. 

 

5/8

सायना नेहवालचा हॉल सुंदर सजवलेला आहे. या खोलीच्या मध्यभागी एक लाकडी कॉफी टेबल आहे, ज्याभोवती काळ्या मऊ लेदरचे सोफे आहेत. या सोफ्यांना काळ्या आणि निळ्या मखमली गाद्या आहेत. एक मोठी काचेची खिडकी आहे जी खोलीत भरपूर सूर्यप्रकाश आणते. 

 

6/8

लिव्हिंग रूमच्या भिंती तपकिरी वॉलपेपर लावलेला आहे त्यावर छान गोल्डन नक्षीकाम केले आहे, ज्यामुळे खोलीला एक सुंदर लूक मिळतो. छताला काचेचा झुंबर देखील लटकलेला आहे, जो प्रकाश आणि सौंदर्य वाढवते. लिव्हिंग एरियाच्या दुसऱ्या कोपऱ्यात सायनाचे वर्कस्टेशन आहे. त्यात लाकडी डेस्कवर एक मॉनिटर ठेवलेला आहे आणि स्टोरेज स्पेसमध्ये भर घालणारे अनेक शेल्फ आणि ड्रॉवरही आहेत.

 

7/8

स्वयंपाकघरातही सुंदर सजावट केली आहे.  भांडीसाठी लाकडी कॅबिनेट, क्लासिक काळे काउंटरटॉप्स आणि पांढरी संगमरवरी फरशी किचनमध्ये आहे. पांढऱ्या पॅनेल असलेल्या काचेच्या खिडक्या लिविंग रूममधील खिडक्यांसारख्याच आहेत. 

 

8/8

सायना नेहवालच्या घराच्या बाहेरील बाजूस हलक्या पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या भिंती आहेत. तिथे  लावलेली रंगीबेरंगी फुले आणि हिरवीगार झाडे डोळ्यांना खूप सुखावतात. खेळाडूच्या घरात एक बाल्कनी देखील आहे, जिथे लाकडी पॅनलच्या सीमेजवळ मोठ्या कुंड्यांमध्ये रोपे लावली आहेत.

 





Read More