Rinku Rajguru : 2016 साली प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले होते. या चित्रपटातील गाणीही हिट झाली होती. याच चित्रपटातून अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. सैराटमुळे रिंकू प्रसिद्धीझोतात आली होती. या चित्रपटामुळे तिने यशाचं शिखर गाठलं होतं. सैराट नंतर झुंड या चित्रपटात आकाश आणि रिंकूची जोडी दिसली. रिंकू आणि आकाश यांच्यात चांगली मैत्री असून रिंकूने नुकतेच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. त्यावर आकाश ठोसरच्या कमेंटनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं....
त्यामुळे अनेकांनी या जोडीला बेस्ट कपल, रिअल कपल, राजा-राणी असं म्हणत कमेंटचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे.
रिंकूने शेअर केलेल्या फोटोवर आकाशने कमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजी असलेली स्माईली पोस्ट केली आहे. तर, रिंकूनेदेखील तशीच कमेंट करत आकाशला रिप्लाय दिला आहे.
या फोटोमध्ये रिंकू कमालीची सुंदर दिसत आहे. त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
रिंकून गुलाबी साडीमध्ये एक सुंदर फोटोशूट केलं असून त्यातील काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
रिंकू सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असून वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येत असते. यात बऱ्याचदा ती तिच्या फोटोशूटमधील काही निवडक फोटोही चाहत्यांसोबत शेअर करते.