PHOTOS

वधू तयार होती... जूनच्या 'या' तारखेला सलमान खान होणार होता नवरा, एक चूक आणि कायमचा पश्चाताप!

सलमान खानची एक मैत्रीण होती जिच्याशी सलमान खान लग्न करण्यास तयार झाला होता. लग्नाची तारीख निश्चित होण्यापूर्वीच सलमान खानने या सुंदरीशी ब्रेकअप केले.

Advertisement
1/9
वधू तयार होती... जूनच्या 'या' तारखेला सलमान खान होणार होता नवरा, एक चूक आणि कायमचा पश्चाताप!
वधू तयार होती... जूनच्या 'या' तारखेला सलमान खान होणार होता नवरा, एक चूक आणि कायमचा पश्चाताप!

Salman Khan: बॉलिवूडचा दबंग सलमान खान हा इंडस्ट्रीतील मोस्ट वॉन्टेड बॅचलरपैकी एक आहे. सलमान खानचे चाहते वर्षानुवर्षे सलमान खानच्या लग्नाची वाट पाहत आहेत. पण सलमान खान अद्यापही सिंगलच आहे. सलमान खानच्या आयुष्यात अनेक सुंदरी आल्या. पण सलमान खानचे नाते लग्नाच्या अतिंम टप्प्यावर पोहोचले आणि सारं काही बिघडलं.

2/9
सलमान खान लग्न करण्यास तयार
 सलमान खान लग्न करण्यास तयार

सलमान खानची एक मैत्रीण होती जिच्याशी सलमान खान लग्न करण्यास तयार झाला होता. लग्नाची तारीख निश्चित होण्यापूर्वीच सलमान खानने या सुंदरीशी ब्रेकअप केले. 

3/9
सलमान खान संगीता बिजलानीच्या प्रेमात
सलमान खान संगीता बिजलानीच्या प्रेमात

ही सुंदरी दुसरी कोणी नसून संगीता बिजलानी आहे. जी आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. एक काळ असा होता जेव्हा संगीता बिजलानी सलमान खानच्या प्रेमात वेडी होती. सलमान खानला संगीता बिजलानी इतकी आवडली की त्यांचे नाते 10 वर्षे टिकले.

4/9
सलमान खानच्या कुटुंबाला आवडायची संगीता बिजलानी
सलमान खानच्या कुटुंबाला आवडायची संगीता बिजलानी

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, संगीता बिजलानी ही सलमान खान आणि त्याच्या कुटुंबालाही खूप आवडत होती. एक काळ असा होता की संगीता बिजलानी सलमान खानच्या घरी खूप येत असे. कुटुंबाने संगीता बिजलानी आणि सलमान खानचे लग्न कोणताही विलंब न करता निश्चित केले.

5/9
सलमान-संगीताचे लग्न ठरले
सलमान-संगीताचे लग्न ठरले

लग्न निश्चित होताच संगीता बिजलानी आणि सलमान खानच्या कुटुंबाने तयारी सुरू केली. या काळात सलमान खान त्याच्या लग्नाबद्दल खूप गोंधळलेल्या अवस्थेत होता.तो संगीता बिजलानीशी लग्न करण्यास पूर्णपणे तयार नव्हता, असे  सलमान खानच्या एका जवळच्या मित्राने सांगितले. 

6/9
लग्नाची तारीख
लग्नाची तारीख

सलमान खान आणि संगीता बिजलानी 7 जून 1994 रोजी सात फेरे घेणार होते. सलमान खान आणि संगीता बिजलानीच्या कुटुंबाने ही लग्नाची तारीख निश्चित केली होती. दरम्यान सलमान खान आणि संगीता बिजलानी यांचे ब्रेकअप झाले.

7/9
सलमान खानचे सत्य आले समोर
सलमान खानचे सत्य आले समोर

 

लग्नापूर्वीच संगीता बिजलानीला सलमान खानबद्दल एक गोष्ट कळली. संगीता बिजलानीला कळले की सलमान खान सोमी अलीच्या जवळ येतोय. सोमी अली आणि सलमान खानमधील जवळीक संगीता बिजलानीच्या ब्रेकअपचे कारण बनली.

8/9
सोमी अली ठरली कारण
सोमी अली ठरली कारण

सोमी अलीमुळे सलमान खान आणि संगीता बिजलानी कायमचे वेगळे झाले आणि त्यांचे लग्न तुटले, असे मानले जाते. सलमान खान लग्न करण्यासही घाबरत होता. बीइंग सलमान नावाच्या पुस्तकात याचा उल्लेख करण्यात आलाय.

9/9
सलमान खानला आजही पश्चात्ताप
सलमान खानला आजही पश्चात्ताप

सलमान खान आणि संगीता बिजलानी यांनी लग्न केले नसेल पण आजही दोघेही मैत्रीचे नाते टिकवून आहेत.सलमान खान आणि संगीता बिजलानी आज लग्न न केल्याबद्दल पश्चात्ताप करत असेल, असे  चाहते अजूनही मानतात.





Read More