बिग बॉस 12 - सलमान खानने बीग बॉसचे 8 सीझन सलग होस्ट केले आहेत. बिग बॉस 12 चंही आयोजन केलं जाईल. एका सीझनसाठी सलमान खान 11 करोड रूपयांचं मानाधन घेतो.
दस का दम - दस का दम हा टेलिव्हिजन शो लवकरच पुन्हा सोनी टीव्हीवर सुरू होणार आहे. या शोचं अॅकरिंग सलमान खान करणार आहे. दस का दमचे प्रोमो टेलिव्हिजनवर सुरू करण्यात आले आहेत.
दबंग 3 - सलमान खानच्या मागील दबंग चित्रपटाच्या दोन्ही यशस्वी कामगिरीनंतर सलमान खान दबंग 3 हा सिनेमा करणार आहे. हा सलमान खानच्या होम प्रोडक्शनमधील एक चित्रपट आहे.
भारत - अली अब्बास जफरसोबत 'भारत' हा चित्रपट सलमान करणार आहे. 'सुल्तान' , 'टायगर जिंदा है' या चित्रपटानंतर अली आणि सलमान 'भारत' या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहे. 'ऑड टू माय फादर' या कोरियन चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे.
रेस 3 - नुकतच सलमान खान 'रेस3' या चित्रपटाचे अबुधाबीमधील शेड्यूल संपवून आला आहे. हा चित्रपट यंदा ईदला म्हणजे 15 जूनला रीलिज होणार आहे. रेमो डिसुझा दिगदर्शित हा चित्रपट 100 कोटी बजेटचा आहे