PHOTOS

समोसा, गुलाब जाम....; भारतीय वाटणारे 'हे' 7 पदार्थ मूळ परदेशी; नावं वाचून थक्क व्हाल!

भारतात असे अनेक लोकप्रिय पदार्थ आहेत जे आपण पारंपरिक भारतीय समजतो. पण खरे पाहता या पदार्थांचा उगम भारतात झालेलाच नाही. त्यांनी भारतात येऊन इथली चव घेतली आणि आपल्या स्वयंपाकघरात कायमचे स्थान मिळवलं. जाणून घेऊयात अशा 7 प्रसिद्ध पदार्थांची मूळ कथा.

Advertisement
1/8
1. बिर्याणी- पर्शिया (इराण)
1. बिर्याणी- पर्शिया (इराण)

भारतात बिर्याणीला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. मात्र, तिचा उगम पर्शियामध्ये झाला होता.  ती मुघलांच्या माध्यमातून भारतात आली. आज प्रत्येक राज्याने स्वतःची खास बिर्याणी स्टाईल तयार केली आहे.

 

2/8
2. चिकन टिक्का मसाला- स्कॉटलंड
2. चिकन टिक्का मसाला- स्कॉटलंड

हे नाव ऐकून वाटतं की हा पूर्णपणे भारतीय पदार्थ आहे. मात्र, याचा जन्म स्कॉटलंडमधील ग्लासगो शहरात 1971 मध्ये एका शेफने ड्राय चिकन टिक्कामध्ये ग्रेव्ही घालून तयार केला. तिथूनच हळूहळू या डिशने भारतात प्रवेश केला.

 

3/8
3. वरणभात- नेपाळ
3. वरणभात- नेपाळ

भारतात विशेषतः महाराष्ट्रात, वरणभात हे अगदी घराघरात खाल्ला जाणारा पदार्थ आहे. पण याचा उगम भारतात नव्हे, तर शेजारील नेपाळमध्ये झाला आहे. नेपाळमध्ये हे रोजचे पारंपरिक अन्न मानले जाते.

4/8
4. गुलाबजाम- भूमध्यसागरीय प्रदेश
4. गुलाबजाम- भूमध्यसागरीय प्रदेश

लग्न समारंभ आणि सणांची शोभा वाढवणारा गुलाबजाम प्रत्यक्षात भूमध्यसागरीय देशांमधून भारतात आला आहे. 'लुक्मत अल-कादी' या गोड पदार्थावरून प्रेरणा घेऊन त्याचा जन्म झाला.

5/8
5. जलेबी- पर्शिया
5. जलेबी- पर्शिया

भारतातील गोडव्याचा एक महत्वाचा भाग असलेली जलेबी खरेतर पर्शियातून भारतात आली. ती 'जुलाबिया' नावाने ओळखली जात होती. भारतात आल्यावर तिची चव आणि स्वरूप दोन्ही बदलले.

6/8
6. नान- इराण
6. नान- इराण

तंदुरी नान हा आज भारतीय रेस्टॉरंटमधील प्रसिद्ध ब्रेड आहे. पण त्याची सुरुवात इराण आणि मध्य आशियात झाली. मुघल काळात नानला भारतात आणले आणि त्यानंतर इथेही हा पदार्थ लोकप्रिय झाला.

7/8
7. समोसा- मध्य पूर्व
7. समोसा- मध्य पूर्व

चहा आणि समोसा हे एक परफेक्ट कॉम्बिनेशन मानलं जातं. पण समोसा खरतंर 'सांबुसक' या नावाने मध्य पूर्वेतून भारतात आला. भारतात आल्यावर त्यात बटाटा आणि मसाल्यांची भर घालून त्याला नवीन ओळख दिली गेली.

8/8

हे सर्व पदार्थ आज आपले वाटत असले, तरी त्यांची मूळ जन्मभूमी भारताबाहेर आहे. त्यांनी भारतात येताच आपली खास 'भारतीय' चव मिळवली आणि आपल्या जेवणाचा अविभाज्य भाग बनले.

 





Read More