PHOTOS

...म्हणून Samsung कंपनी कर्मचाऱ्यांना शुक्रवारीही देणार सुट्टी! कारण आहे फारच रंजक

Samsung Extra Day Off: जगतिक स्तरावरील इलेक्ट्रॉनिक कंपन्यांच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी अशी ओळख असलेल्या सॅमसंगने नुकताच एक फार महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अर्थात असा निर्णय घेणारी सॅमसंग ही काही पहिलीच कंपनी नाही. मात्र दक्षिण कोरियामधील या सर्वात मोठ्या कंपनीने घेतलेला निर्णय वर्क कल्चरकडे पाहण्याचा दृष्टीकोन कशापद्धतीने बदलत आहे हे दर्शवते असं म्हटलं जात आहे. सॅमसंगने नक्की काय आणि का म्हटलंय आणि त्याचा काय अर्थ काढला जातोय पाहूयात...

Advertisement
1/12

वर्क फ्लेक्झिबिलिटीला प्राधान्य देणाऱ्या तरुणांना रिटेन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उद्योग क्षेत्रातील सर्वात आघाडीच्या कंपन्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या सॅमसंगने महिन्यातून एक अतिरिक्त सुट्टी देण्याचं ठरवलं आहे. ही सुट्टी देण्यामागील नेमकं कारणासंदर्भात कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे. 

2/12

जगातील सर्वात मोठी मेमरी चीप मेकर कंपनी आणि दक्षिण कोरियामधील सर्वात मोठी कंपनी अशी ओळख असलेल्या सॅमसंगने महिन्यातील एका शुक्रवारी कर्मचारी सुट्टी घेऊन शकतात असं म्हटलं आहे. 

3/12

जून महिन्याच्या मध्यापासून हा सुट्टीचा नियम लागू होणार आहे. फॅक्ट्रीमध्ये काम न करणाऱ्या आणि फूल टाइम कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार दिला जातो त्या आठवड्यातील शुक्रवारी सुट्टी घेता येणार आहे.

4/12

सामान्यपणे सॅमसंगच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार 21 तारखेच्या आठवड्यामध्ये दिला जातो. याच आठवड्यामध्ये कर्मचारी शुक्रवारी सुट्टी घेऊ शकतात असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी ब्लूमबर्गशी बोलताना सांगितलं.

5/12

स्थानिक स्तरावरील सॅमसंगची सर्वात मोठी स्पर्धक कंपनी असलेल्या एस. के. हेनिक्स कंपनीने अशाच पद्धतीचा नियम मागील वर्षापासून लागू केला आहे. एका आठवड्यामध्ये 40 तासांपेक्षा अधिक काम केलं असेल तर त्या कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे शुक्रवारी सुट्टी घेण्याची मूभा कंपनीकडून देण्यात आली आहे. याच नियमाच्या आधारे सॅमसंगनेही शुक्रवारी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.

6/12

कोरोना कालावधीनंतर केवळ सॅमसंगचं नाही दक्षिण कोरियामधील अनेक कंपन्यांनी वर्क फ्लेक्झिबिलीटीअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार कामाची सवलत दिल्याचं पहायला मिळालं.

7/12

सॅमसंगने घेतलेल्या या शुक्रवारच्या सुट्टीच्या निर्णयामुळे कष्टकऱ्यांचा देश अशी ओळख असलेल्या दक्षिण कोरियासारख्या देशातही कोरोनाच्या साथीनंतर कामाकडे पाहण्याचा दृष्टीकोन किती बदलला आहे हे दर्शवतो.

 

8/12

सॅमसंगचं जन्मस्थान असलेला दक्षिण कोरिया हा जगातील सर्वाधिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देश आहे. 2021 च्या आकडेवारीनुसार येथील कर्मचारी इतर देशांच्या तुलनेत सरासरी 200 तासांहून अधिक वेळ जास्त काम केल्याचं दिसून आलं आहे. 

9/12

तरुण कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडून जाऊन नये या हेतूने सॅमसंग कंपनीने शुक्रवारच्या अतिरिक्त सुट्टीचा मोठा निर्णय घेतला आहे. 

10/12

वर्क-लाइफ बॅलेन्सला प्राधान्य देणाऱ्या तरुण कर्मचाऱ्यांचा विचार करुन सॅमसंग कंपनीने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

11/12

सॅमसंगच्या एकूण कर्मचारी वर्गापैकी 40 टक्के कर्मचारी हे तरुण आहेत असं कोरिया इकनॉमिक डेलीने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे. दक्षिण कोरियामधील सॅमसंगच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरील प्लॅण्टमध्ये एकूण 1.2 लाख कर्मचारी आहेत.

12/12

कर्मचाऱ्यांचा विचार करुन अशाप्रकारे पहिल्यांदाच एखाद्या कंपनीने अतिरिक्त सुट्टी दिलीय असं नाही. यापूर्वी कोकाओ कॉर्परेशन कंपनीने प्रत्येक महिन्याचा शेवटचा शुक्रवार सुट्टी असेल असं घोषित केलं होतं. याच कंपनीची उपकंपनी असलेल्या कोकाओने महिन्यातील 2 शुक्रवारी सुट्टी जाहीर केली.





Read More