Sarfarosh 25th anniversary screening : सरफरोश हा चित्रपटाच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त बॉलीवूड स्टार आमिर खान आणि सरफरोशची टीम मुंबईत चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग करणार आहेत.
मुंबईतील पीव्हीआर जुहू येथे 10 मे रोजी स्पेशल स्क्रिनिंग होणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख कलाकारांव्यतिरिक्त इतर बॉलिवूड स्टार देखील उपस्थित असतील.
संगीत दिग्दर्शक ललित पंडित, मुकेश ऋषी, नसीरुद्दीन शाह, मकरद देशपांडे, नवाजुद्दीन सिद्दीकी, राजेश जोशी, स्मिता जयकर, मनोज जोशी, उपासना सिंग, अखिलेंद्र मिश्रा आणि आकाश खुराना देखील उपस्थित राहणार आहेत.
मात्र, अनेकदा चर्चा होती ते सरफरोशच्या रिमेकची... सरफरोश सिनेमा तेलुगूच्या अस्त्रम या सिनेमाचा रिमेक आहे का? असा प्रश्न विचारला जातो.
अस्त्रम हा 2006 चा भारतीय तेलुगु भाषेतील ॲक्शन क्राईम चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन सुरेश कृष्णा यांनी केलं आहे.
अस्त्रम या चित्रपटात विष्णू मंचू, अनुष्का शेट्टी, जॅकी श्रॉफ आणि राहुल देव यांच्या भूमिका आहेत.
खरं पहायला गेलं तर, अस्त्रम हा तेलुगू सिनेमा सरफरोश या हिंदी चित्रपटाचा हा रिमेक आहे.
सरफरोश सिनेमा रिलीज झाल्यावर चित्रपट समीक्षक आणि व्यावसायिक दोन्ही पद्धतीने यशस्वी झाला होता.