PHOTOS

Sarva Pitru Amavasya 2023 : सर्वपित्री अमवास्येवर सूर्यग्रहणाची सावली; 'हे' काम करु नका, पितरांची नाराजीमुळे येईल आर्थिक संकट

Sun Transit 2023 : शनिवारी 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्येवर सूर्यग्रहणाची सावली आहे. यादिवशी शनि अमावस्यादेखील आहे. त्यामुळे या दिवशी चुकूनही काही कामं करु नका अन्यथा पूवर्ज नाराज होतील. 

Advertisement
1/7

ज्योतिषशास्त्रानुसार या दुर्मिळ योगायोगात चुकून काही गोष्टी करुन नका. अन्यथा पितर नाराज होतील. पितरांच्या नाराजीमुळे दारिद्र,  दु:ख आणि अनेक समस्या घरावर कोसळण्याची भीती असते. 

2/7

14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण रात्री 8:34 वाजेपासून मध्यरात्री 2:25 पर्यंत असणार आहे.

3/7

सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्याचा कोणताही परिणाम दिसणार नाही आहे. तसंच त्याचा सुतक काळही वैध नसेल तरीही या दिवशी काही काम करणे टाळा. 

 

4/7

सूर्यग्रहणामुळे सर्वपित्रीअमावस्येला तुळशीची पूजा करू नका. तसंच तुळशीची पानेही तोडू नका. असं केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते आणि घरावर आर्थिक संकट येतं.  

5/7

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे. या दिवशी चुकूनही शारीरिक संबंध ठेवू नयेत. असं केल्यास पूर्वजांच्या नाराजीची तुमच्यावर ओढू शकते, अशी मान्यता आहे. त्याशिवाय याशिवाय राहू-केतू ग्रहांचाही जीवनावर नकारात्मक परिणाम पडतो. 

6/7

सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण असल्याने गरोदर महिलांनी घराबाहेर जाणे टाळावे. त्याशिवाय तीक्ष्ण वस्तूचा वापर करु नका. 

7/7

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी चुकूनही तामसिक अन्न शिजवू नका किंवा खाऊ नका. तसंच, स्मशानभूमी किंवा निर्जन जंगलात जाऊ नका. अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्ती सक्रिय होतात आणि कमकुवत मानसिक स्थिती असलेल्या लोकांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)  





Read More