Saturn Vs Jupiter Rance: तुम्हाला कल्पना नसेल पण सध्या सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरु आणि स्वत:भोवती मोठं कडं असलेला सुर्यमालेतील ग्रह शनीमध्ये एक अनोखी स्पर्धा सुरु आहेत. ही स्पर्धा नेमकी काय आहे आणि त्यात सध्या कोणी आघाडी घेतलीय जाणून घेऊयात...
सुर्यमालेतील सर्वाधिक चंद्र कोणत्या ग्रहाला आहेत तुम्हाला ठाऊक आहे का? अर्थात पृथ्वीला एक चंद्र असल्याची माहिती आपल्यापैकी सर्वांनाच आहे. मात्र सर्वाधिक चंद्र असलेला आपल्या सुर्यमालेतील ग्रह आणि याचसंदर्भातील रंजक माहिती अनेकांना ठाऊक नाही. त्यावरच टाकलेली नजर...
सुर्यमालेतील सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह अशी फेब्रुवारीपर्यंत गुरु ग्रहाची ओळख होती. गुरु ग्रहाने 95 चंद्रांसहीत आपल्या नावे केला होता. मात्र आता हा विक्रम त्याच्या नावावर राहिलेला नाही. कारण अन्य एका ग्रहाने त्याला या स्पर्धेत मागे टाकलं आहे.
गुरुला चंद्रांच्या संख्येमध्ये मागे टाणाऱ्या ग्रहाचं नाव आहे शनी. शनीचे नवे 62 चंद्र सापडले असून आता तो सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह ठरला आहे.
शनीचे एकूण चंद्र नेमके किती आहेत असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे 145. शनी इतके चंद्र सूर्यमालेतील इतर कोणत्याच ग्रहाकडे नाहीत.
फेब्रुवारी महिन्यात गुरु ग्रहाचे 12 चंद्रांचा नव्याने शोध लागला. त्यानंतर गुरुच्या चंद्राची संख्या 95 वर पोहोचली.
मात्र गुरु हा सर्वाधिक चंद्र असणारा ग्रह फार काळ राहू शकला नाही कारण शनीच्या नव्या चंद्रांचाही शोध लगेचच लागला. त्यामुळे सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह ही ओळख गुरुऐवजी शनीला मिळाली.
यूनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाचे अंतराळवीर प्राध्यापक ब्रेट ग्लॅण्डमॅन यांनी शनीच्या चंद्रांची संख्या दुप्पट झाली आहे असं म्हटलं आहे. शनीचे नवे 62 चंद्र शोधणाऱ्या टीमध्ये ब्रेट यांचा समावेश आहे.
शनीच्या नव्या 62 चंद्रांना लवकरच नावं दिली जाणार आहेत. गॅलिक, नॉर्स अशी काही नावं निश्चित करण्यात आली आहेत. कॅनडामधील काही देवांची नावंही या चंद्रांला दिली जाणार आहेत.
असं मानलं जातं की शनीचा एखादा मोठा चंद्र पुर्वी अस्तित्वात होता. त्याच चंद्राचे तुकडे झाल्याने त्याचे अनेक छोटे छोटे चंद्र निर्माण झाले.
शनीच्या चंद्राचे तुकडे झाल्यानंतर ते शनी भोवती फिरु लागले. मात्र गुरु ग्रहाच्या आजूबाजूला आणखीन चंद्र आढळून येण्याची शक्यता असल्याने शनीकडील हा सर्वाधिक चंद्रांचा मुकूट किती दिवस टिकणार हे सांगता येत नाही.
ब्रेट यांच्या सांगण्यानुसार, एका अंदाजाप्रमाणे शनीकडे गुरुपेक्षा 3 पट अधिक चंद्र आहेत. मात्र अद्याप या सर्व चंद्रांचा शोध लागलेला नाही. मात्र हा एक केवळ अंदाज असून प्रत्यक्षात शोध घेतल्यानंतरच या चंद्रांना ग्राह्यं ठरलं जाऊ शकतं असंही ब्रेट म्हणाले.