श्रावण महिना काही दिवसांमध्ये सुरु होणार आहे. या दिवसांमध्ये भाविक भगवान शिव यांच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. पण अनेकांना माहिती नाही की शिवलिंगाच्या कोणत्या ठिकाणी चंदन लावल्यास नशीब उजळते? जाणून घ्या सविस्तर
श्रावण महिना काही दिवसांमध्ये सुरु होणार आहे. अशावेळी भाविक भगवान शिव यांच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. पण अनेकांना शिवलिंगावर चंदन कुठे लावावे हे माहित नसते.
आज आम्ही तुम्हाला श्रावण महिन्यात सर्वप्रथम शिवलिंगावर कोणत्या 7 ठिकाणी चंदन लावल्यास नशीब उजळते याबद्दल सांगणार आहोत. सर्वात प्रथम शिवलिंगावर चंदन लावावे.
यामुळे शरीरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. तसेच वैवाहिक जीवनात आनंद येतो. दुसरा चंदनाचा टिळा हा शिवलिंगाच्या उजव्या बाजूला लावावा. यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारते.
तसेच जलधारीच्या दुसऱ्या बाजूला कार्तिकेय वास करतात असं म्हटलं जातं. त्यामुळे तिथे चंदनाचा तिसरा टिळा लावा. यामुळे संतती प्राप्तीसाठी खूप फलदायी मानले जाते.
तर शिवलिंगातून वाहणाऱ्या पाण्याच्या मार्गावर त्यांची कन्या अशोक सुंदरीचे स्थान असते. त्यामुळे तिथे देखील चंदनाचा टिळा लावावा. यामुळे योग्य जीवनसाथी मिळतो.
पाचवा टिळा हा शिवलिंगाच्या जलधारीवर लावावा. कारण असं म्हटलं जातं की यामुळे आपल्या आयुष्यातील दु:ख दूर होतात.
सहावा टिळा हा शिवलिंगाच्या मागील बाजूला लावावा. हा टिळा लावल्याने आपल्या शत्रूचा नाश होतो. तसेच आपल्या कुटुंबात आनंद देखील येतो.
तर सातवा टिळा हा महादेवाच्या समोर असणाऱ्या नदी महाराजांच्या दोन्ही शिंगांवर लावावा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)