PHOTOS

महागड्या प्रोटीन्सला करा गुडबाय; तयार करा घरच्या घरीचं 1 महिना टिकणारी प्रोटीन पावडर

जर तुम्ही नियमितपणे जिममध्ये जाऊन व्यायाम करता आणि मसल्स गेन करायचा प्रयत्न करत असाल. तर शरीरासाठी पुरेसे प्रोटीन मिळणं अत्यंत आवश्यक आहे. बाजारात मिळणाऱ्या प्रोटीन पावडरमध्ये अनेकवेळा कृत्रिम फ्लेवर्स, केमिकल्स आणि प्रेझरवेटिव्ह्स असतात. त्याशिवाय त्यांची किंमतही खूप जास्त असते. तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक आणि आरोग्यदायी प्रोटीन पावडर अगदी सहज बनवू शकता, तीही कोणत्याही केमिकल्सशिवाय.  

 

Advertisement
1/7

आजकाल अनेकजण जिममध्ये जाऊन व्यायाम करण्याचा निर्णय घेतात. मात्र, व्यायामानंतर शरीराला आवश्यक पोषण मिळावे म्हणून बहुतांश लोक बाजारात मिळणाऱ्या प्रोटीन पावडरचे सेवन करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, या पावडरमध्ये किती प्रमाणात केमिकल्स असतात? ही प्रोटीन पावडर शरीराला पोषण तर देतात, पण त्यासोबतच त्याचे काही नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात. त्यामुळे अशा पावडरच्या ऐवजी तुम्ही घरच्या घरीच नैसर्गिक आणि केमिकल फ्री प्रोटीन पावडर अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकता. पाहूया, याची सोपी आणि आरोग्यदायी रेसिपी.

2/7
साहित्य:
साहित्य:

1 कप मखाणा, 1 कप हरभऱ्याची डाळ, 1/2 कप बदाम, 1/2 कप  पिस्ता, 1/2 कप  अक्रोड, 1/2 कप काजू. या सर्व घटकांमध्ये प्रथिन, चांगले फॅट्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे मिश्रण शरीराला ताकद देणारे, स्नायू वाढवणारे आणि थकवा दूर करणारे आहे.

3/7
कृती :
कृती :

सर्व साहित्य स्वच्छ धुवा आणि काही वेळ उन्हात वाळवून घ्या. मखाणे आणि हरभऱ्याची डाळ तसेच सुकामेवा वेगवेगळ्या पॅनमध्ये मंद आचेवर भाजा. भाजल्यामुळे ओलसरपणा निघून जातो आणि टिकवण्यासाठी मदत होते. आता सर्व भाजलेले पदार्थ पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर मिक्सरमध्ये सर्व साहित्य एकत्र करून बारीक पावडर तयार करा. ही पावडर कोरड्या आणि हवाबंद डब्यात भरून ठेवा.

4/7
कशी वापरावी?
कशी वापरावी?

व्यायाम केल्यानंतर 1 ते 2 चमचे प्रोटीन पावडर गरम किंवा थंड दूध, पाणी किंवा स्मूदीमध्ये मिसळून प्या. तुम्ही ही पावडर ओट्स, शेक्स, किंवा अगदी पॅनकेक्समध्ये देखील मिसळू शकता.

5/7

ही पावडर हवाबंद कंटेनरमध्ये ठेवल्यास 1 महिना सहज टिकते. ओलसरपणा टाळण्यासाठी थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवा.

6/7
टिप्स:
टिप्स:

चव वाढवण्यासाठी तुम्ही दालचिनी पूड, कोको पावडर किंवा सुक्या खजूराची पूड घालू शकता. वजन वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी ही पावडर एक उत्तम घरगुती पर्याय ठरू शकते.

7/7




Read More