SBI Home Loan Interest Rate: तुम्हीही गृहकर्ज अर्थात होम लोनच्या चिंतेनं हैराण झालात? हरकत नाही, लगेच पाहा एसबीआयची ही नवी आणि खिशाला परवडणारी योजना
डोक्यात असंख्य हिशोब सुरु होतात. घरखर्च, एखाद्या वेळी आवडीनिवडी अशा अनेक गोष्टींची आकडेमोडही सुरु होते. तुम्हीही अशाच चिंतेत आहात का? एसबीआय तुमची मदत करेल.
भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या SBI कडून खातेधारकांसाठी कर्जसुविधा पुरवली जात आहे. कमीत कमी व्याजदरावर कर्ज मिळवण्याच्या प्रयत्नांत असाल तर, आज तुमच्याकडे शेवटची संधी आहे
SBI कडून तुम्हीही कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर, या कर्जाच्या व्याजदरात तुम्हाला 55 बीपीएसपर्यंतची सवलत मिळणार आहे. यासाठीच्या प्रोसेसिंग फीची आजची म्हणजे 31 ऑगस्ट 2023 ही अखेरची तारीख आहे.
(State Bank Of India) भारतीय स्टेट बँकच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार बँकेकडून प्रोसेसिंग फीवरही साधारण 50 ते 100 रुपयांची सूट दिली जात आहे.
नियमित गृहकर्ज, फ्लेक्सीपे, एनआरआय, नॉन सॅलगी होम लोन अशा प्रकारांवर ही सवलत मिळत आहे.
बँकेकडून दिल्या जाणाऱ्या माहितीनुसार एचएएल आणि टॉप वर्जनसाठी कार्ड रेटमध्ये 50 टक्के सवलत दिली जात असून 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे. इथं GST मध्येही सूट असल्यामुळं ग्राहकांचा फायदाच आहे.
टेक ओवर, रेडी टू मूव्ह, रिसेल होम लोनवर बँकेकडून 100 टक्के प्रोसेसिंग फी सूट दिली जाणार आहे. पण, इंस्टा होम टॉप अप, रिवर्स मॉर्टगेज, ईएमडीसाठी मात्र कोणतीही सवलत नसेल. यावर प्रोसेसिंग फी लोन अमाउंटसाठी 0.35 ची रक्कम मोजावी लागणार आहे.