SBI Scheme : पैसे कुठे गुंतवायचे, कसे गुंतवायते इथपासून पैसे किती आणि केव्हा गुंतवायचे इथपर्यंतचे प्रश्न सर्वांनाच पडतात. एसबीआय या सर्वच प्रश्नांची उत्तरं देत आहे.
ही एक स्पेशल टेन्योर एफडी स्कीम आहे.
या योजनेचा कालावधी 400 दिवसांचा असून, इच्छुकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे अर्ज 31 मार्च 2023 पर्यंत देता येतील.
'अमृत कलश डिपॉझिट' असं या योजनेचं नाव. 400 दिवसांच्या एफडीवर या योजनेत 7.10 टक्के इतकं व्याज बँकेकडून दिलं जातं.
ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 7.60 टक्के म्हणजेच सर्वसामान्य व्याजदरांपैकी साधारण 0.50 टक्क्यांनी जास्त असेल.
भारतीय आणि अनिवासी भारतीय नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात.
तेव्हा आता तुम्ही जितकी रक्कम या योजनेमध्ये गुंतवता तितका फायदा तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं या योजनेचा नेमका फायदा कसा घ्यायचा हे सर्वस्वी तुमच्यावरच अवलंबून असेल.