SBI Sukanya Samriddhi Yojana : केंद्र सरकारशिवाय सरकारी बँकांकडून अनेक प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशा एका योजनेबद्दल सांगणार आहे ज्यामध्ये तुमच्या मुलीला तब्बल 15 लाख रुपये मिळतील. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) मुलींसाठी ही खास योजना सुरु केली आहे. जाणून घेऊयात कशाप्रकारे मिळवता येते ही सुविधा...
एसबीआय सुकन्या समृद्धि योजना (sukanya samriddhi yojana): एसबीआयने मुलींबद्दलच्या या योजनेसंदर्भात माहिती देताना मुलींना 15 लाखांपर्यंतचा निधी देणार आहे. या पैशांचा वापर मुलींच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठीही करता येईल.
जमा करावे लागतील 250 रुपये : बँकेने एका ट्वीटमध्ये या योजनेबद्दलची माहिती दिली आहे. सर्व मुलींना बँकेच्या माध्यमातून सुकन्या समृद्धि योजनेची (sukanya samriddhi yojana) सुविधा पुरवली जाते, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. यामध्ये केवळ 250 रुपये भरुन मुलींचं भवितव्य आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम करण्याची संधी पालकांना आहे.
मिळणार गॅरंटीड इन्कमचा फायदा : या सरकारी योजनेची खास गोष्ट ही आहे की याअंतर्गत गॅरंटीड इन्कमचा फायदा मिळतो. तसेच या योजनेअंतर्गत पैसे गुंतवल्यास करसवलतही मिळते. ही योजना फक्त लहान मुलींसाठी आहे. मुलींचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून बँकेच्या मदतीने ही योजना राबवली जाते.
किती व्याज मिळणार? सरकार सध्या या सुकन्या समृद्धि योजनेअंतर्गत 7.6 टक्के दराने व्याज देत आहे. त्याशिवाय दोन मुलींसाठीही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. एक मुलगी असताना जुळ्या मुली झाल्या तर तिन्ही मुलींना या योजनेचा फायदा घेता येणार आहे.
वयोमर्यादेचं बंधन काय? या योजनेअंतर्गत मुलींचं खातं सुरु करण्यासाठी कमाल वयोमर्यादा ही 15 वर्ष आहे. या योजनेअंतर्गत दिलेल्या वेळेत पैसे जमा करता आला नाही तर 50 रुपये पेनल्टी भरुन पुढील हफ्ता भरता येईल.