Scam 2003 Trailer : 2020 साली आलेल्या Scam 1992 या वेबसिरिजनं सर्वत्र धुमाकूळ घातला होता. 5000 कोटींचा झालेला Bank Receipt स्कॅममुळे हर्षद मेहता हे नावं फारच चर्चेत आलेले होते. ही वेबसिरिज प्रचंड गाजली होती. आता याच सिरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ज्याचे नावं आहे Scam 2003 : The Telgi Story
अभिनेते आणि अॅड गुरू भरत दाभोळकरही हटके लुकमध्ये दिसत आहेत. त्यामुळे एकंदरीतच या सिरिजची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. गगन देव रायर हे प्रमुख भुमिकेतून दिसत आहेत.
अभिनेत्री भावना भावसारही यावेळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री शुभा खोटे यांच्या त्या कन्या आहेत.
आपल्या सर्वांचाच लाडका चॉकलेट बॉय हा देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शशांक केतकरही आपल्याला या सिरिजमधून दिसणार आहे. त्यानं आपल्या इन्टाग्राम पेजवरूनही याची अपडेट दिली होती.
यावेळी समीर धर्माधिकारी देखील वेगळ्या भुमिकेतून दिसत आहेत. यावेळी ते राजकीय भुमिकेतून दिसत आहेत, असे समजते.
आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते भरत जाधवही ट्रेलरमध्ये दिसत आहेत. ट्रेलरच्या शेवटी आपल्याला त्यांचा लुक पाहायला मिळतो आहे.
या मालिकेतून आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते निखिल रत्नपारखीही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ते या सिरिजमध्ये वेगळ्या भुमिकेत दिसत आहेत.
त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे या सिरिजची. भरत जाधवपासून शशांक केतकरपर्यंत अनेक मराठी कलाकार या सिरिजमधून पाहायला मिळणार आहेत. ही सिरिज हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केली असून 2 सप्टेंबरला ती प्रदर्शित होणार आहे.
Scam 2003 चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी मराठी कलाकारांची रेलचेल या सिरिजमधून अधिक पाहायला मिळते आहे.