PHOTOS

सूर्यमालेत Interstellar Object ची घुसखोरी; महाकाय वस्तूमुळं वाढली धाकधूक

Interstellar Object: पृथ्वीभोवती अंतराळात काही संकटांचा विळखा पाहायला मिळत असून, अशाच एका संकटाची चाहूल नासाच्या संशोधकांना लागली आहे. 

Advertisement
1/8
अंतराळ
अंतराळ

Interstellar Object: खगोलशास्त्रज्ञांनी नुकतीच अंतराळातील एक अद्वितीय आणि तितकीच महत्त्वाची घटना नोंदवली असून, त्यामुळं काही अंशी शास्त्रज्ञांच्या वर्तुळात चिंतेचा सूरही पाहायला मिळत आहे. 

2/8
Interstellar Object
 Interstellar Object

अंतराळात टीपल्या गेलेल्या या Interstellar Object ला शास्त्रज्ञांनी A11pl3Z असं नाव दिलं असून, सध्या ही वस्तू आपल्या सूर्यमालेतूनच पुढे जात असून, सूर्यमालेत तिसऱ्यांदा अशी घटना घडली आहे. 

 

3/8
NASA
NASA

सर्वप्रथम या वस्तूची कुणकूण NASA च्या Asteroid Terrestrial-impact Last Alert System(ATLAS) ला लागली. ज्यानंतर अंतराळ क्षेत्राच्या निरीक्षणकर्त्यांनी त्याबाबतची सविस्तर माहिती मिळवण्यास सुरुवात केली. 

4/8
A11pl3Z
A11pl3Z

सध्या ESA चे प्लॅनेटरी डिफेंडर A11pl3Z वर लक्ष ठेवून आहेत. सूर्यमालेबाहेरून आलेल्या या वस्तूचा मार्ग अतिशय वेगळा असून, त्याला हायपरबॉलिक संबोधलं जात आहे. 

5/8
eccentricity
eccentricity

संशोधकांच्या निरीक्षणानुसार त्याची उत्केन्द्रता(eccentricity) 6 ते 11.6 दरम्यान असून, सूर्यमालेत आलेली ही अतिशय महाकाय वस्तू ठरत असल्यानं चिंतेत भर पडत आहे. 

6/8
गुरुत्वाकर्षण
गुरुत्वाकर्षण

A11pl3Z ची वेगळी वाट पाहता तो सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाशी निगडीत नसल्याचं स्पष्ट होत आहे. सूर्यमालेतून पुढे जाताना ही वस्तू पुन्हा एकदा Interstellar Space मध्येच परतेल. 

7/8
गुरु ग्रहापाशी
 गुरु ग्रहापाशी

सध्या A11pl3Z गुरु ग्रहापाशी असून ऑक्टोबर महिन्यात तो सूर्याच्या सर्वात नजीक असेल असं म्हटलं जात आहे. जेव्हा तो साधारण 200 मिलियन किमी अंतरावर असेल. 

 

8/8
महाकाय आकार
महाकाय आकार

प्राथमिक स्वरुपातील माहितीनुसार या बाह्यवस्तूमुळं पृथ्वीला कोणताही धोका नाही. मात्र हा A11pl3Z मंगळाच्या अतिशय जवळून जाणार असल्या कारणानं तो पाहण्याची संधी मात्र पृथ्वीवासियांना मिळू शकते. सूर्यमालेतून पुढे जाणारी ही Interstellar Object साधारण 20 किमी इतक्या मोठ्या आकाराची असून, त्याचं परिमाण 18.8 मॅग्नीट्यूड असल्याचं म्हटलं जात आहे. 

 





Read More