जर तुम्ही देखील गुगलवर या गोष्टी सर्च करत असाल तर तुम्ही देखील कायद्याच्या तावडीत अडकू शकता. जाणून घ्या सविस्तर
चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित सामग्री शोधणे हे कायद्यानुसार गुन्हा आहे. यामुळे तुम्हाला जेल देखील होऊ शकते.
बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया किंवा त्यासंदर्भातील सामग्री शोधणे हा देखील गुन्हा आहे. जर तुम्ही असे केले तर तुम्ही सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर येऊ शकता.
दारुगोळा किंवा ड्रग्जची खरेदी किंवा त्यासंबंधित माहिती जर तुम्ही शोधत असाल तर तुम्ही कायद्याच्या तावडीत अडकू शकता.
त्याचप्रमाणे जर तुम्ही बनावट चलन छापण्याच्या प्रकियेचा गुगलवर शोध घेत असाल तर तो गुन्हा असून त्यामुळे तुम्हाला जेल होऊ शकते.
बेकायदेशीर मार्गाने पैसे कमावण्याबद्दलची माहिती शोधणे हे देखील कायद्याच्या विरोधात आहे.
तसेच गुगलवर वेबसाइट किंवा अकाउंट हॅक केल्याची माहिती सर्च करत असाल तर तो गुन्हा आहे. तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
तुम्ही गंभीर आजारांवरील उपचारांची माहिती शोधत असाल आणि त्याचा अवलंब केल्यास ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.