बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा संजू साठी त्याचे चाहते अत्यंत उत्सुक आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या सिनेमात रणबीर कपूर, संजय दत्तच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान रणबीरचे अनेक फोटोज व्हायरल झालेत. त्यात रणबीर हुबेहुब संजय दत्तसारखा दिसत आहे. ते फोटोज पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे. आता सिनेमातील इतर भूमिका कोण साकारणार, हे देखील स्पष्ट झाले आहे.
परेश रावल, मनीषा कोईराला, दीया मिर्जा, विकी कौशल, सोनम कपूर, जिम सरभ आणि करिश्मा तन्ना या कलाकारांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. तर पाहुया या सिनेमात कोण कोणाची भूमिका साकारणार...
संजय दत्तच्या भूमिकेत रणबीर कपूर झळकणार आहे. या सिनेमातील रणबीरचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
सुनील दत्तची भूमिका साकारणार परेश रावल- सुनील दत्त हे संजय दत्तचे वडील. आज ते आपल्यात नाहीत पण त्यांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात आहेत. सिनेमात त्यांची भूमिका परेश रावल साकारणार आहे.
नर्गिस दत्त साकारणार मनिषा कोईराला- संजय दत्तची आई नर्गिस दत्त. त्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. सिनेमात त्यांची भूमिका मनिषा कोईराला साकारणार आहे.
मान्यता दत्त असेल दीया मिर्जा- जेलमध्ये असताना संजय दत्तला सर्वात अधिक साथ पत्नी मान्यता दत्तची मिळाली होती. संजू सिनेमात पत्नी मान्यताची भूमिका दीया मिर्जा साकारणार आहे.
कुमार गौरवच्या भूमिकेत विकी कौशल- संजय दत्तची बहिण नम्रता दत्तचे पती कुमार गौरव यांच्या भूमिकेत विकी कौशल असेल.
टीना मुनीम असेल सोनम कपूर- संजय आणि टीना मुनीम बालपणापासूनचे फ्रेंड्स आहेत. कालांतराने मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र हे नाते फार काळ टिकले नाही. तर सिनेमात टीना मुनीम यांची भूमिका सोनम कपूर साकारणार आहे.
सलमान खानच्या भूमिकेत जिम सरभ- सलमान आणि संजय खूप चांगले मित्र आहेत. मात्र दोघांच्या मैत्रीत अनेक चढ उतार आले. तर सिनेमात सलमानच्या भूमिकेत असेल जिम सरभ.
माधुरी दीक्षितची भूमिका साकारेल करिश्मा तन्ना- संजय-माधुरीने एकत्र अनेक सिनेमे केले. त्यादरम्यान वाढलेली जवळीकतेचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांचे अफेअर चांगलेच गाजले. तर माधुरीच्या भूमिकेत करिश्मा तन्ना दिसेल. (सर्व फोटो सौजन्य- DNA)