September 2023 lucky zodiac signs : सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यात गुरु, शुक्र, बुध, मंगळ आणि सूर्य आपली रास बदलणार आहे. त्यामुळे 6 राशींसाठी सप्टेंबर महिना लकी ठरणार आहे.
सप्टेंबर महिना ग्रह आणि नक्षत्रासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. ग्रह गोचरमुळे काही राशींच्या नशिबात यशासोबत धनलाभाचे योग आहेत. कुठल्या आहेत त्या 6 राशी जाणून घ्या.
सप्टेंबर महिन्यात 4 सप्टेंबर 2023 ला शुक्र कर्क राशीत आणि गुरू मेष राशीत वक्री होणार आहे. त्यानंतर 16 सप्टेंबर ला 2023 बुध सिंह राशीत, 17 सप्टेंबर 2023 ला सूर्य कन्या राशीत आणि 24 सप्टेंबर 2023 ला मंगळ कन्या राशीत संक्रमण करणार आहे.
मेष राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्या लकी ठरणार आहे. तुमची रखडलेली कामं मार्गी लागणार आहेत. तुमच्या समस्येचे निरासन होणार आहे. तुमचं वेळ आणि ऊर्जा योग्य मार्गाने वापरल्यामुळे तुम्हाला भरघोस यश मिळणार आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्याची शुभ असणार आहे. नोकरीत इच्छित बदली होणार आहेत. करिअर आणि व्यवसायात अनपेक्षित प्रगतीमुळे तुमचं मन प्रसन्न असणार आहे. या महिन्यात तुमच्या उत्पन्नाचं स्त्रोत वाढणार आहे. सुखसोयी आणि चैनीशी संबंधित काही महागड्या वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत.
या राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप छान असणार आहे. तुमचं व्यक्तिमत्व चमकणार आहे. समस्यांवर मात करणार आहात. रखडलेली कामं सहज पूर्ण होणार आहे. कामातील अडथळे दूर होतील. व्यवसायिकांना फायदा होणार आहे. लव्ह लाईफमध्येही सकारात्मक परिणाम दिसणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना खूप भाग्यवान सिद्ध होणार आहे. या महिन्यात तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अनपेक्षित यश लाभणार आहे. तुम्हाला नफा प्राप्त होणार आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे. मित्रांच्या सहकार्याने तुमचे दीर्घकाळ रखडलेले काम पूर्ण मार्गी लागणार आहेत. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे.
या राशीसाठी सप्टेंबर महिन्याची सुरुवात अतिशय शुभ असणार आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. नोकरीत पदोन्नतीची संधी आहे. व्यवसायात चांगला नफा लाभणार आहे. धनलाभाचे योग आहेत.
या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना अतिशय शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला काही चांगली मिळणार आहे. ऑफिसपासून घरापर्यंत सर्वत्र तुमच्या गुणांची आणि कामाची प्रशंसा होणार आहेत. समाजात तुमचा सन्मान वाढणार आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्याशी दयाळूपणे वागणार आहेत. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)