PHOTOS

जगातील 7 न उलगडलेली रहस्य, विचित्र दगड, न समजणारी भाषा, कित्येक दशकं लोटली तरीही या वास्तुंचे गूढ आजही कायम!

आपल्या पूर्वजांनी अशा अनेक गोष्टी बनवल्या आहेत. ज्या आजच्या आधुनिक युगातही आपल्या समजण्यापलिकडच्या आहेत. हे रहस्य अजूनही उलगडलेले नाहीये. 

Advertisement
1/8
जगातील 7 न उलगडलेली रहस्य, विचित्र दगड, न समजणारी भाषा, कित्येक दशकं लोटली तरीही या वास्तुंचे गूढ आजही कायम!
जगातील 7 न उलगडलेली रहस्य,  विचित्र दगड, न समजणारी भाषा, कित्येक दशकं लोटली तरीही या वास्तुंचे गूढ आजही कायम!

जगात अशा अनेक रहस्यमय गोष्टी आहेत ज्यामागील गूढ अद्यापही उलगडलेले नाहीये. मग ते मिस्रचे पिरॅमिड असो किंवा सिंधु घाटीतील भाषा ही रहस्य अद्यापही इतिहासकार आणि वैज्ञानिकांना उलगडलेली नाहीत. कोणते आहेत हे 7 रहस्य जाणून घेऊयात. 

2/8

इजिप्शियन पिरॅमिड हे जगातील सर्वात प्रसिद्ध प्राचीन आश्चर्यांपैकी एक आहे. हे पिरॅमिड इतक्या बारकाईने आणि अचूकतेने बांधले गेले आहेत की आजही शास्त्रज्ञ आणि इतिहासकारांना आश्चर्य वाटते की ते कोणत्याही आधुनिक यंत्रांशिवाय कसे बांधले गेले असतील. अनेक सिद्धांत मांडले आहेत परंतु यातील पूर्णपणे सिद्ध होऊ शकला नाही.

3/8

 इंग्लंडच्या मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या या महाकाय दगडांची रचना आजही एक गूढ आहे. काही जण म्हणतात की हे दगड म्हणजे एक खगोलशास्त्रीय वेधशाळा होती, तर काही जण ते धार्मिक स्थळ मानतात. पण त्यांचा खरा उद्देश काय होता, हे आजही स्पष्ट झालेले नाही.

4/8

अटलांटिस हे एक प्राचीन शहर असल्याचे म्हटले जाते. हे शहर समुद्रात बुडाले. या शहराची कहाणी प्लेटो नावाच्या ग्रीक तत्वज्ञानी मांडली होती. पण आजपर्यंत हे शहर खरोखर अस्तित्वात होते की फक्त एक कल्पना होती हे सिद्ध झालेले नाही. या शहराचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

5/8

चिलीतील इस्टर बेटावरील हे विचित्र डोके असलेले पुतळे अजूनही शास्त्रज्ञांसाठी एक गूढ आहेत. हे जड पुतळे कोणत्याही वाहनाशिवाय किंवा यंत्राशिवाय बेटाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात कसे नेण्यात आले हा प्रश्न अद्यापही कायम आहे.

6/8

पेरूमध्ये जमिनीवर असलेल्या या प्रचंड रेषा फक्त आकाशातूनच दिसतात. या रेषा पक्षी, प्राणी आणि मानवी आकारांच्या आहेत. त्यांचा उद्देश काय होता आणि ते इतक्या अचूकतेने कसे बनवले गेले हे अजूनही एक गूढ आहे.

7/8

इजिप्तमध्ये असलेल्या या विशाल पुतळ्याचे शरीर सिंहाचे आणि डोके माणसाचे आहे. त्याच्या निर्मितीचा काळ, त्याचा उद्देश आणि त्याचा चेहरा कोणाचे प्रतिनिधित्व करतो  या प्रश्नांची आजपर्यंत कोणतीही स्पष्ट उत्तरे सापडलेली नाहीत.

 

8/8

भारत आणि पाकिस्तानच्या काही भागात पसरलेल्या या संस्कृतीत राहणारे लोक खूप प्रगत होते. पण आजपर्यंत कोणीही त्यांची भाषा व लेखन वाचू शकलेले नाही. यासोबतच, ही संस्कृती अचानक कशी संपली हा देखील आतापर्यंतचा एक मोठा प्रश्न आहे. 





Read More