Sex Scandals in Cricket: क्रिकेटच्या इतिहासात अशा काही घटना घडल्या आहेत ज्यांनी खेळाला लाजवेल. सेक्स स्कँडल्ससारखे (Sex Scandals in Cricket) वाद क्रिकेटमध्येही पाहायला मिळाले आहेत. सेक्स स्कँडलमध्ये अनेक स्टार क्रिकेटर्सची नावे समोर आली होती. नुकतचं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा (Babar Azam video viral) एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एखाद्या खेळाडूसोबत किंवा क्रिकेटपटूसोबत असं पहिल्यांदा घडलेलं नाही. याआधीहा सेक्स स्कँडलचे असे अनेक वाद समोर आले आहे.
पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझमच्या (Babar Azam video viral) अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून बाबरचे पर्सनल फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही पोस्ट इन्स्टाग्रामवरील eish. arajpoot केले असून कथित स्वरूपात तरूणीने बाबर आझमवर फसवणुकीचे आरोप केले आहेत.
तर वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलवर (Chrisgayle) 2015 मध्ये मसाज थेरपिस्टने गंभीर आरोप केले होते. मसाज करताना ख्रिस गेलने टॉवेल सोडून प्रायव्हेट पार्ट दाखल्याचा आरोप मसाज थेरपिस्ट महिलेने केला होता. मात्र या आरोपातून ख्रिस गेलला क्लीन चीट मिळाली होती.
तसेच ऑस्ट्रेलियाचा महान फिरकिपटू शेन वॉर्नवर (Shane Warne) ब्रिटिश नर्स डोना राइटला आक्षेपार्ह टेक्स मेसेज पाठवल्याचा आरोप केला होता. दरम्यान 2006 मध्ये 2 मॉडेल्ससोब त्याचे काही अश्लील फोटो लीक झाले होते.
तर इंग्लडचा माजी कर्णधार केविन पीटरसन (Kevin Peterson) दक्षिण आफ्रिकेच्या वैनेसा निम्मो हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यानंतर तिने आरोप केला की, पीटरसनने अफेअर फक्त एका मेसेजद्वारे संपवले. तसेच त्याला सेक्सची भूक असायची आणि त्यासाठी दबाब टाकायचा.
तसेच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीसुद्धा (Shahid Afridi) एका हॉटेलमध्ये सहकारी खेळाडूंसह तो मुलींसोबत सापडला होता. तेव्हा मुली ऑटोग्राफसाठी आल्याचा दावा त्यांनी केला होता. पण पीसीबीने त्यांच्यावर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीत खेळण्यास बंदी घातली होती.