PHOTOS

'मी सकाळी 10 ला उठते कारण रात्री उशीरापर्यंत आमच्या घरी..'; गौरी खानचा Simple Life बद्दल खुलासा

Gauri Khan Talks About Why She Wake Up At 10 am: अभिनेता शाहरुख खानची पत्नी या ओळखीव्यक्तीरिक्त गौरीने मागील काही वर्षांमध्ये आपली स्वत:ची एक वेगळी ओळख मनोरंजनसृष्टीबाहेर निर्माण केली आहे. गौरी ही एका सुपरस्टारची पत्नी असण्याबरोबरच एक उत्तम इंटिरिअर डिझायनर आहे. ती उत्तम उद्योजिका असून अनेक सेलिब्रिटी तिचे क्लायंट्स आहेत. मात्र हे सारं करताना ती आई असल्याची जबाबदारीही पार पडतेय. गौरीने तिच्या दिनक्रमाबद्दल सांगताना नेमकं काय म्हटलंय पाहूयात...

Advertisement
1/12

अभिनेता शाहरुख खानची पत्नी ही ओळख वगळता गौरी खान ही रेड चिलीज एन्टर्टेनमेंटमध्ये निर्मातीही आहे. खरं तर गौरी एक उत्तम एंटिरीअर डिझायनर आहे. आता तिने हॉटेल व्यवसायामध्येही पदार्पण केलं आहे.

 

2/12

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये गौरी खानने आपण साधं आयुष्य जगतो असं म्हटलं आहे. गौरीने तिची मुलं आर्यन, सुहाना आणि अबराम हेच आपल्या प्राधान्यक्रमावर असल्याचंही नमूद केलं. अबराम सायंकाळी शाळेतून परत येतो तेव्हा मी आवर्जून घरी थांबते असंही गौरीने सांगितलं.

3/12

गौरी खानने 'कर्ली टेल्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या दिनक्रमाबद्दल सांगितलं. "मी सकाळी उठल्यानंतर कॉफी पिते, जीमला जाते. त्यानंतर दुपारचं लंच करते. मग कामाला सुरुवात करते," असं गौरी म्हणाली.

4/12

माझी तिन्ही मुलं हीच माझी प्रायोरिटी आहेत, असं गौरीने आवर्जून सांगितलं.  आर्यन, सुहाना आणि अबरामला जास्तीत जास्त वेळ देण्याचा आपला प्रयत्न असतो असं गौरी म्हणाली. 

 

5/12

अबराम दुपारी 3 वाजता घरी येतो. त्यानंतर मी त्याच्यासोबत वेळ घालवते. पुन्हा सायंकाळी मी कामानिमित्त घराबाहेर पडते आणि थेट रात्रीच्या जेवणाऱ्या वेळी घरी येतो. अगदी साधं आयुष्य जगते मी, असंही गौरी सांगायला विसरली नाही.

 

6/12

सायंकाळी नेमकं किती वाजता घरी यायला तुला आवडतं असं विचारण्यात आलं असता गौरीने, 'मी माझ्या सर्व भेटीगाठी साडेसातपर्यंत संपवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक दिवस वेगळा असतो. कधीतरी भेटीगाठींसाठी उशीर होतो,' असं सांगितलं.

 

7/12

गौरी आणि शाहरुख खानच्या लग्नाला 32 वर्ष पूर्ण झाली आहेत. गौरीला मुंबईमध्ये राहण्यात फारसा रस नव्हता. मात्र नंतर ती मुंबई शहराच्या प्रेमात पडली. शाहरुख सुपरस्टार झाल्यानंतर दोघं 'मन्नत'मध्ये राहू लागले. 

 

8/12

शाहरुख आणि गौरीने अगदी प्रेमाने साकारलेल्या 'मन्नत'ची किंमत आजच्या घडीला 200 कोटी रुपये इतकी आहे.

 

9/12

शाहरुख खानने 'माय लाइफ इन डिझाइन' पुस्तकामध्ये गौरीने स्वत: 'मन्नत'च्या इंटिरिअरची जबाबदारी स्वीकारल्याचं सांगितलं आहे. 'मन्नत'सारखी महागडी प्रॉपर्टी विकत घेतल्याने आर्थिक परिस्थिती वेगळा डिझायनर हायर करण्यासाठी नव्हती असं शाहरुखने प्रांजलपणे सांगितलं.

10/12

"मोठ्या आकाराचं घर डिझाइन करणं, जवळच्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि आपल्याला हवं तसं घर तयार करता आलं पाहिजे यासाठी गौरीने बऱ्याच नव्या गोष्टी शिकूनव घेतल्या. तिने जागेचं नियोजन आणि मुलभूत गरजांसंदर्भात बराच अभ्यास करुन घराचं इंटिरिअर साकारलं आहे," असं शाहरुख म्हणाला. 

11/12

दरम्यान, गौरीने आपला दिनक्रम सांगताना ती उशीरा झोपेतून उठते हे आवर्जून सांगितलं. "मी सकाळी लवकर झोपेतून उठणाऱ्या लोकांपैकी नक्कीच नाही. आमचं घरी रात्री उशीरापर्यंत सर्वजण जागे असतात त्यामुळे मी सकाळी 10 वाजता झोपेतून उठते," असं गौरी म्हणाली. 

 

12/12

गौरी आणि शाहरुखचा मित्रपरिवार मोठा आहे. अनेकदा त्यांच्या घरी त्यांचे निकटवर्तीय जमतात. बऱ्याचवेळा छोट्या-मोठ्या पार्ट्यांमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.





Read More