PHOTOS

शाहरुख खानच्या करिअरमधील पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट, ज्याने प्रदर्शित होताच शाहरुखला किंग बनवलं

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आज त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण तुम्हाला माहिती आहे की, शाहरुख खानचा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट कोणता आहे. जाणून घ्या सविस्तर

Advertisement
1/7
59 वा वाढदिवस
59 वा वाढदिवस

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आज त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याला इंडस्ट्रीमध्ये 32 वर्षे पूर्ण झाले आहेत. यामध्ये त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 

2/7
हिट चित्रपट
हिट चित्रपट

शाहरुख खानला बॉलिवूडचा किंग खान म्हटले जाते. 32 वर्षांच्या करिअरमध्ये शाहरुख खानने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

3/7
दीवाना
दीवाना

शाहरुखने 1992 मध्ये 'दीवाना' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर शाहरुखने अनेक हिट चित्रपट दिले. 

4/7
दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे
दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे

जेव्हा देखील शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा विषय येतो, तेव्हा सर्वात प्रथम त्याच्या 1995 मधील 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' चित्रपटाचे नाव समोर येते. 

5/7
ब्लॉकबस्टर
ब्लॉकबस्टर

परंतु शाहरुख खानने या चित्रपटाच्या आधी एक ब्लॉकबस्टर चित्रपट दिला होता. त्याचा हा चित्रपट 1993 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्याला किंग बनवले. 

6/7
बाजीगर
बाजीगर

शाहरुख खानच्या या चित्रपटाचे नाव 'बाजीगर' आहे. 1993 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटातून शाहरुख रातोरात स्टार झाला. 

 

7/7
वेगळी ओळख
वेगळी ओळख

या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्याच्या अभिनयाने त्याला एक ओळख दिली जी आज कायम आहे. या चित्रपटात काजोल आणि शिल्पा शेट्टी देखील होत्या. 





Read More