Pakistan Cricket Team : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीवर (Shaheen Shah Afridi) मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि टीम स्टाफसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
बाबर आझम याच्या कामगिरीवर देखील पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाराज असल्याने पुन्हा शाहीन आफ्रिदीकडे संघाची जबाबदारी देण्यात येणार का? असा सवाल विचारला जात आहे.
शाहीनला टी-20 वर्ल्ड कपपूर्वी कर्णधारपदावरून हटवण्यात आलं होतं, ज्यामुळे तो पीसीबीवर नाराज होता. 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला होता.
शाहीन आफ्रिदीने पाकिस्तान टीममध्ये दोन गट पाडले अन् कट रचले. खेळाडूंमध्ये एकी दिसली नाही, अशी माहिती पाकिस्तानी माध्यमामधून समोर आली आहे.
अशातच शाहीनच्या याच वर्तनामुळे त्याला बांगलादेश दौऱ्यातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता पाकिस्तानचे बॉलिंग कोच जेसन गिलेस्पीने महत्त्वाची माहिती दिली.
दरम्यान, शाहीन आफ्रिदी बाळाच्या जन्मामुळे बांगलादेशविरुद्धच्या कसोटीतून बाहेर असू शकतो. तोपर्यंत त्याला पत्नीसोबत वेळ घालवायचा असेल तर आपण त्याला ब्रेक देऊ शकतो, असं जेसन गिलेस्पीने सांगितलं.