PHOTOS

2025 चा फ्लॉप चित्रपट OTT वर प्रदर्शित होताच ट्रेंडिगमध्ये, सस्पेंस असा की शेवट पर्यंत...

2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या फ्लॉप चित्रपटाने ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही पण आता OTT वर पहिल्या नंबरवर आहे. 

Advertisement
1/7

OTT वर नेहमी ट्रेंडिंग चित्रपटाची यादी बदलत असते. प्रत्येक आठवड्याला नवे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत असतात. यावेळी एका फ्लॉप चित्रपटाने OTT वर कब्जा केला आहे. 

2/7

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा 2025 मध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा एक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट होता. चित्रपटात पूजा हेगडे, कुब्रा सैत, पवैल गुलाटी आणि प्रवेश राणा हे कलाकार होते.

3/7

या चित्रपटाचे नाव 'देवा' आहे. चित्रपटात शाहिद कपूर हा पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक रोशन एंड्रयूज आहेत. 

4/7

चित्रपटात देवा हा एक आक्रमक पोलीस ऑफिसर असल्याचे दाखवले आहे. जो कोणाचही ऐकत नाही. तो त्यांच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी करत असतो. 

5/7

तो कोणापुढे झुकत नाही आणि नेहमी टेंशनमध्ये असतो. देवाच्या मित्राला जेव्हा गोळी मारून हत्या करण्यात येते तेव्हा चित्रपटाची कहाणीला सुरुवात होते. 

6/7

त्यावेळी देवा हा स्वत: या केसची जबाबदारी घेतो. एके दिवशी तो त्याच्या वरिष्ठांना फोन करून आरोपी सापडला असे सांगतो. तेवढ्यात त्याचा अपघात होता. 

7/7

या अपघातात देवा त्याची स्मृती गमावतो. त्यानंतर पूर्ण चित्रपट होईपर्यंत तुम्हाला आरोपीची माहिती मिळत नाही. या चित्रपटाने OTT वर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. 





Read More