PHOTOS

'बॉलिवूडमध्ये शाहरूख खान आणि सेक्सच विकलं जातं', 20 वर्षांपूर्वीच्या विधानावर नेहा धुपिया ठाम

Neha Dhupia Birthday : अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली. शिवाय तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे तिने बॉलिवूडमध्ये भूकंप आला आला होता. 

Advertisement
1/9

नेहाचा जन्म 27 ऑगस्ट 1980 ला भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याच्या घरात झाला. नेहाने 2002 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला आहे. अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकसोबत तिच्या वक्तव्याने कायम चर्चेत राहिली. 

2/9

नेहा लग्नापूर्वी प्रेग्नेंट राहिल्यामुळे तिला नेटिझन्सकडून अगदी निर्दयीपणे ट्रोल करण्यात आले होते.

3/9

तिने ही बातमी घरी सांगितल्यावर आईने छान असं उत्तर दिलं पण त्यानंतर तिने लग्न करण्यासाठी फक्त 72 तास दिले होते. 

4/9

त्यानंतर मुंबईत अतिशय खाजगीत अंगद बेदीसोबत नेहाने लग्न केलं. या दोघांना आज एक मुलगी आणि एक मुलगा आहे.

5/9

शाहरुखबद्दल तिने 2004 मध्ये एक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच भूकंप आला होता. 

6/9

 ती म्हणाली होती की, बॉलिवूडमध्ये सेक्स आणि शाहरुख खान दोनच गोष्टी विकल्या जातात. 

7/9

तब्बल 20 वर्षांनीही ती या विधानावर ठाम असल्याचं ती सोशल मीडियावर बोलली. तिने ट्वीट करत लिहिलं की, 20 वर्षांनंतरही माझं म्हणणं खरं आहे. हे अभिनेत्याची कारकीर्द नसून राजाची राजवट आहे. पठाण चित्रपटाच्या यशानंतर तिने हे ट्वीट केलं होतं. 

8/9

2004 बद्दल बोलायचं झालं तर नेहा धुपियाचा जुली चित्रपट आला होता. या चित्रपटात नेहाने अनेक इंटिमेट सीन्स दिले होते. या चित्रपटात तिने सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिला सेक्स सिम्बॉल अशी पदवी देण्यात आली. 

9/9

त्यावेळी एका मुलाखतीत ती म्हणाली होती, या चित्रपटामुळे मी मल्लिका शेरावत आणि बिपाशा बसूला मागे टाकलं, असं लोक म्हणतात, याने मला काही फरक पडत नाही. आजच्या काळात एकतर सेक्स विकला जातो किंवा शाहरुख खान. 





Read More