Shanaya Kapoor Photos : अर्ध्याहून अधिक बॉलिवूडही जामनगरमध्ये पाहायला मिळालं. दिग्गज कलाकार म्हणू नका किंवा मग नव्या जोमाचे कलाकार. सर्वांनीच जामनगर गाठलं होतं.
कपूर, बच्चन (Kapoor and Bachchan Family) अशी कलाजगतातली सेलिब्रिटी कुटुंबही अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी हजर राहिली आणि या सोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमामध्ये या मंडळींनी अगदी घरातल्या कार्यक्रमाला लावतात तशीच हजेरी लावली.
अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे एकाहून एक सरस लूक इथं चर्चेचा विषय ठरले. या साऱ्यामध्ये एका चेहऱ्यानं सर्वांच्याच नजरा वळवल्या. हा चेहरा कोणाचा होता माहितीये? हा चेहरा होता अनिल कपूरच्या पुतणीचा, अर्थात अभिनेत्री शनाया कपूरचा. अभिनेता संजय कपूरची ही लेक.
शनाया अद्याप कलाजगतामध्ये फारशी प्रसिद्धीझोतात आली नसली तरीही तिचं स्टाईल स्टेटमेंट आणि फॅशन सेन्स कायमच लक्ष वेधून जातो. जामनगरमधी सोहळाही यास अपवाद ठरला नाही.
शनायानं या सोहळ्यात एकाहून एक सरस लूक केले. यामध्ये सर्वाधिक कमाल ठरला तो म्हणजे काळ्या रंगाच्या गाऊनमधील लूक. ऑफशोल्डर आणि लाँग स्लीव्ह्ज असणाऱ्या या लूकमध्ये ती एखाद्या हॉलिवूड अभिनेत्रीसारखी दिसत होती.
फ्रन्ट पार्टींग आणि मागे लाल रंगाच्या फुलाचं सुरेख काम असणाऱ्या या गाऊनवर शनायानं गडद लाल रंगाची लिपस्टीक आणि किमान ज्वेलरीला पसंती दिली होती. साईड पार्टीशन असणाऱ्या तिच्या हेअरस्टाईलनं हा लूक आणखी प्रभावी केला होता.
शनाया आली, तिनं पाहिलं आणि तिच्या एका नजरेनं अनेकजण घायाळ झाले. या संपूर्ण सोहळ्यादरम्यान शनायानं भारतीय आणि पाश्चिमात्य पेहरावांना पसंती दिली होती.
साडी, हाय वेस्ट पँट्स, लेहंगा, गाऊन या आणि अशा अनेक लूकला पसंती देणारी शनाया प्रत्येक वेळी कमालीची Confident दिसत होती. कपूर कुटुंबातील हा नवा चेहारा आता कलाजगतामध्ये आपलं स्थान नेमकं कसं नर्माण करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.