एखाद्याच्या शरीराच्या अवयवांच्या आकारावरून आपण त्याच्या जीवनाबद्दल आणि त्याच्या स्वभावाबद्दल जाणून घेऊ शकतो का? ही गोष्ट रंजक वाटत असेल तरी समुद्रशास्त्रानुसार हे सांगता येतं.
समुद्र शास्त्रानुसार गोलाकार नाभी असलेल्या महिला 'प्रेमळ स्वभावाच्या' असतात. या आकाराच्या नाभी असलेल्या बहुतेक महिला सुंदर, सौम्य आणि बुद्धिमान असून त्या आनंदी जीवन जगण्यावर विश्वास ठेवतात.
ज्या महिलांची नाभी उथळ असते त्यांच्या स्वभाव हा कमकुवत, नकारात्मक आणि चिडखोर असतो. जर पुरुषांना अशी नाभी असेल तर ते अनेकदा आळशी असल्याचे आढळून येते. ही लोक वेळेवर त्यांचे काम पूर्ण करत नाही. सपाट नाभी असलेले पुरुष बुद्धिमान आणि स्पष्ट बोलणारे असं समुद्र शास्त्रात सांगण्यात आलंय.
या आकाराची नाभी असलेल्या महिला साध्या स्वभावाच्या मानल्या जात असून त्या भावनिकही असतात. पुरुषांबद्दल बोलायचं झालं तर ही लोक भाग्यवान, बुद्धिमान, दयाळू आणि व्यवस्थापन क्षमता असणारी असतात. मात्र त्यांना खूप संघर्षानंतर यश प्राप्त होतं.
याला 'आदर्श नाभी' असं म्हटलं जातं. अशा नाभी असलेल्या महिला आनंदी आणि प्रसन्न स्वभावाच्या असतात. त्या उत्साही असतात आणि लोकांना भेटायला त्यांना आवडतं. पुरुषांच्या बाबतीतही असाच स्वभाव असतो.
या नाभी असलेल्या महिलांना लाईम लाईटमध्ये राहायला आवडतं. ज्यामुळे काही वेळा इतर लोक त्यांचा फायदा घेतात. अशा महिलाही हट्टी असल्याचं म्हटलं जातं. पुरुषांचा स्वभावही फारसा असाच असतो.
या आकाराची नाभी असलेल्या महिला आणि पुरुषांना विचारवंत म्हटलं जातं. पण अनेक वेळा त्यांना चांगल्या संधी गमावून अतिविचाराचा फटका सहन करावा लागतो.
या नाभी असलेल्या महिला अनेकदा काम अर्धवट सोडतात. थकवा त्यांना पटकन व्यापून टाकतो. पुरुषांच्या बाबतीत, त्यांना अधिक कन्यारत्न मिळतात, मात्र पहिल्या मुलीच्या जन्माने त्यांचं नशीब चमकतं.
या प्रकारची नाभी असलेल्या महिलांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. त्यांचे कुटुंब आणि मित्रांशी चांगले संबंध असतात. ते स्वभावाने आशावादी राहतात. पुरुषांच्या बाबतीतही अशाच स्वरूपाची वैशिष्ट्ये नोंदवली जातात.
अशा महिला केवळ सावधच नसतात तर त्यांचा स्वभाव संशयास्पद असतो.
अशा नाभी असलेल्या महिला निरोगी राहतात आणि त्यांना पैशाची कमतरता नसते. अशा महिला कुटुंबाभिमुख असतात.