Sharat Saxena: आज बॉलिवूडमध्ये अनेक आघाडीचे अभिनेते आहे जे आपल्या बॉडीसाठीही ओळखले जातात. परंतु बॉलिवूडमध्ये असेही काही अभिनेते (Sharat Saxena Body) आहेत जे वयानं मोठे असले तरी त्यांची बॉडी पाहून हे भले भले अभिनेतेही फिके पडतील. त्यातील एक नावं आहे शरत सक्सेना.
90 च्या दशकात विलन म्हणून शरत सक्सेना यांचे नाव लोकप्रिय आहे. मिस्टर इंडिया या त्यांच्या लोकप्रिय चित्रपटानं त्यांना वेगळीच ओळख मिळवून दिली.
शरत सक्सेना आज 72 वर्षांचे आहेत. त्याचसोबत ते सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. आजच्या तरूणाईला लाजवले असा त्यांच्या फिटनेस आहे.
सोशल मीडियावर ते आपल्या बॉडी बिल्डिंगचे फोटोज शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोंना सोशल मीडियावर तूफान लाईक्स येताना दिसतात.
त्यांचे तरूण फॅन्सही त्यांच्या या फोटोंवर कमेंट्स करतात. ते आपले जिममधले फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करतात. त्यामुळे आजच्या जिममध्ये जाणाऱ्या तरूणाईलाही लाजवतील असा त्यांचा फिटनेस आहे.
त्याचसोबत त्यांच्या बॉडीकडे पाहून तुम्हीही म्हणाल की यांच्यासमोर तर सलमान खान आणि जॉन अब्राहमही फिके आहेत.
(PHOTOS - ZEE NEWS)