Shardul Thakur Networth : भारताचा स्टार ऑलराऊंडर आणि मराठमोळा क्रिकेटर शार्दूल ठाकूर याने आयपीएल 2025 मध्ये जबरदस्त कमबॅक केलं. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये शार्दूल अनसोल्ड ठरला होता. मात्र एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने त्याला लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध गोलंदाजी करताना तब्बल 4 विकेट्स घेतल्या. शार्दूलच्या या कमबॅकची सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा आहे. तेव्हा लॉर्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शार्दूल ठाकूरची एकूण संपत्ती किती याविषयी जाणून घेऊयात.
आयपीएल 2024 मध्ये चेन्नईकडून खेळणाऱ्या शार्दूल ठाकूरला मेगा ऑक्शनपूर्वी रिटेन करण्यात आलं नाही. शार्दूल जेव्हा ऑक्शनमध्ये आला तेव्हा त्याला खरेदी करण्यासाठी कोणत्याही संघाने बोली लावली नाही. परिणामी शार्दूल अनसोल्ड ठरला. आयपीएल 2025 मध्ये खेळण्याचे रस्ते बंद झाले आहेत असं वाटतं असतानाच लखनऊ सुपर जाएंट्सचा गोलंदाज दुखापतग्रस्त असल्याने शार्दूल ठाकूरला त्याची रिप्लेसमेंट म्हणून संघात घेण्यात आले.
आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्सला दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव मिळाला होता. तर गुरुवारी त्यांचा दुसरा सामना हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध होता. या सामन्यात शार्दूल ठाकूरची प्लेईंग 11 मध्ये निवड झाली आणि त्याने मिळालेल्या संधीचं सोनं करत लखनऊकडून सर्वाधिक 4 विकेट्स घेतले. यासोबतच शार्दूलला प्लेअर ऑफ द मॅच आणि पर्पल कॅप सुद्धा मिळाली. शार्दूलने लखनऊकडून दोन सामने खेळताना 6 विकेट्स घेतल्या.
2017 मध्ये शार्दूल ठाकूरचं श्रीलंके विरुद्ध भारताच्या वनडे संघात पदार्पण झालं. त्यानंतर 2018 रोजी त्याने टी 20 आणि टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. शार्दूल भारताच्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 संघाचा देखील भाग होता ज्यात टीम इंडिया उपविजेता ठरली होती. मात्र त्यानंतर शार्दूल ठाकूरला टीम इंडियात खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. शार्दूल ठाकूरने त्याचा शेवटचा वनडे सामना 2023 मध्ये बांगलादेश विरुद्ध खेळला होता. तर शेवटचा टेस्ट सामना सुद्धा 2023 मध्येच साऊथ आफ्रिका विरुद्ध खेळला.
शार्दूल ठाकूरच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर ती 6 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 49 कोटी रुपये इतकी आहे. शार्दूलची कमाईचा मुख्य स्रोत बीसीसीआयचं वार्षिक कॉन्ट्रॅक्ट, आयपीएल सॅलरी, ब्रँड एंडोर्समेंड्स आणि गुंतवणूक ही आहे.
शार्दूल ठाकूरचे मुंबई तसेच पालघर येथे आलिशान घर असून देशातील काही भागांमध्ये सुद्धा त्याची संपत्ती आहे. यासोबतच त्याच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज एसयूवी सारख्या अनेक लक्झरी गाड्यांचा समावेश आहे.
इंस्टाग्रामवर पेड पार्टनरशिपच्या माध्यमातून शार्दूल ठाकूर कोट्यवधी रुपये कमावतो. शार्दूल हा प्यूमा, स्केचर्स, रियलमी इत्यादींचा ब्रँड अँबॅसिडर आहे.
शार्दूल ठाकूरला लखनऊ सुपर जाएंट्सने 2 कोटी रुपयांना विकत घेतले. तर शार्दूलकडे बीसीसीआयचं ग्रेड सीचं कॉन्ट्रॅक्ट असून यातून त्याला वर्षाला जवळपास 1 कोटी रुपये मिळतात.