PHOTOS

खासदार महुआ मोइत्रा आणि शशी थरुर यांचे खासगी फोटो व्हायरल! थरुर म्हणाले, 'ती मला...'

Shashi Tharoor Mahua Moitra Viral Photos: काँग्रेस खासदार शशी थरुर आणि तृणमूल काँग्रेसच्या वादग्रस्त खासदार महुआ मोइत्रा यांचे खासगी फोटो मागील काही दिवसांपासून व्हायरल झाले आहेत. अनेक दिवसांनंतर या दोन्ही नेत्यांनी या फोटोंवर प्रतिक्रिया नोंदवली असून दोघांनी आपण भेटलो होतो हे मान्य करत नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात...

Advertisement
1/11

पैसे घेऊन संसदेमध्ये प्रश्न विचारल्याच्या प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

2/11

महुआ मोइत्रा आणि काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांचे काही खासगी फोटो व्हायरल झाले असून दोघे आजूबाजूला बसून ड्रिंक्स घेताना दिसत आहे. 

3/11

महुआ मोइत्रा एका फोटोमध्ये चक्क सिगार ओढताना दिसत आहेत. फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघांनीही यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.

4/11

महुआ मोइत्रा आणि शशी थरुर यांचे हे फोटो खासगी भेटीतील असल्याचं सांगत व्हायरल केले जात आहेत. मात्र हे फोटो नेमके कुठले आहेत आणि त्यामागील सत्य काय आहे हे दोघांनीही सांगितलं आहे.

5/11

महुआ मोइत्रा यांच्याबरोबरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर शशी थरुर यांनी हे स्वस्तातलं आणि खालच्या स्तराचं राजकारण असल्याचं म्हटलं आहे. हा फार काही गंभीर मुद्दा नाही असं थरुर म्हणालेत.

6/11

शशी थरुर यांनी महुआ मोइत्रा यांच्याबरोबरच्या फोटोंसंदर्भातील सत्य सांगितलं आहे. हे फोटो महुआ मोइत्रा यांच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या वेळेचे असल्याचं सांगितलं आहे. महुआ मोइत्रा यांनीही या फोटोंवर प्रतिक्रिया नोंदवली आहे.

 

7/11

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्याबरोबरच्या फोटोंबद्दल बोलतना शशी थरुर यांनी, "माझं आयुष्य लोकांना समर्पित आहे. अशाप्रकारच्या गोष्टी स्वस्तातल्या राजकारणाचा भाग आहेत. माझ्या मते हा फार काही गंभीर मुद्दा नाही," असं थरुर म्हणाले आहेत.

8/11

"माझ्यासाठी ती एका लहान मुलीसारखी आहे. ती (खासदार महुआ मोइत्रा) माझ्यापेक्षा जवळपास 20 वर्षांनी लहान आहे," असंही थरुर म्हणाले आहेत.

9/11

"तिच्या वाढदिवसाची पार्टी होती. त्यामध्ये माझ्या बहिणीसहीत 15 लोक सहभागी होतो. संपूर्ण फोटो दाखवण्याऐवजी कापून फोटो एडीट करुन व्हायरल केले जात आहेत," असंही थरुर यांनी सांगितलं आहे. 

10/11

या फोटोंवर महुआ मोइत्रा यांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे. "मला फार आश्चर्य वाटत आहे की माझे काही खासगी फोटो सोशल मीडियावर भाजपाच्या ट्रोलर सेनेकडून व्हायरल केले हात आहेत," असं म्हणत महुआ मोइत्रा यांनी थेट भाजपावर निशाणा साधला आहे.

11/11

ट्वीटरवरुन प्रतिक्रिया नोंदवताना पश्चिम बंगालमधील महिला आयुष्य जगण्यास प्राधान्य देतात असा टोला लगावला आहे. "मला पांढऱ्या ब्लाऊजपेक्षा हिरवा ड्रेस अधिक आवडतो. आणि हे फोटो क्रॉप का केले आहेत. या डिनर पार्टीला आलेले इतर लोकही दाखवा. बंगालमधील महिला आयुष्य जगतात, खोटं बोलत नाहीत," असं महुआ मोइत्रा म्हणाल्या आहेत.





Read More