Shikhar Dhawan Retirement : भारतीय माजी सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याने सर्वांना धक्का देत आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अशातच निवृत्तीनंतर शिखर मुलाच्या आठवणीत भावूक झाला.
टीम इंडियाचा रांगडा गडी आणि मिस्टर आयसीसी अशी ओळख असलेल्या शिखर धवनने 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर शिखरने टीम इंडियासाठी अनेक अवघड सामने जिंकवून दिलेत.
आपल्या 13 वर्षांच्या कारकिर्दीत शिखरने अशक्य अशा इनिंग खेळून दाखवल्या अन् भारतीयांना कधीही निराश केलं नाही. शुन्यावर बाद झाला तरी हसरा चेहरा घेऊन जाणारा शिखर आणि 99 वर बाद झाला तरी हसरा चेहऱ्यासह ड्रेसिंग रुममध्ये जाणारा शिखर तुम्ही पाहिला असेल.
शिखरने ज्या हसऱ्या चेहऱ्याने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्याच हसऱ्या चेहऱ्याने त्याने आज निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर शिखर मुलाच्या आठवणीत मात्र भावूक झाला. शिखरने नेमकं काय म्हटलं? पाहा
माझा मुलगा झोरावर आता 11 वर्षांचा झाला आहे. मला आशा आहे की, त्याला माझ्या निवृत्तीची बातमी समजली असेल आणि त्याला माझ्या क्रिकेट करियरची देखील माहिती असेल, असं म्हणत शिखने लेकाची आठवण काढली.
सकारात्मकता आणणारा एक चांगला माणूस म्हणून झोरावरने मला आठवणीत ठेवावं अशी माझी इच्छा आहे. त्याला आजूबाजूची नकारात्मक असून नये, त्याला सकारात्मक लोक मिळावी, असं शिखर धवनने म्हटलं आहे.