Shilpa Shetty Trolled For Wearing Boots While Flag Hosting:शिल्पा शेट्टी ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. अनेकदा ती चर्चेत असते. यावेळी ध्वजारोहणाच्यावेळी बुट घातल्यानं सोशल मीडियावर ती ट्रोल झाली आहे. त्यातून तिनं यावर उत्तरही दिले आहे.
शिल्पा शेट्टी ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. त्यातून तिची सोशल मीडियावरही अनेकदा चर्चा ही रंगलेली असते. मध्यंतरी आपल्या पतीच्या पोर्न चित्रपटांमुळे ती चर्चेत आली होती. अनेकदा शिल्पा शेट्टीला सोशल मीडियावरही ट्रोल केले जाते. सध्या पुन्हा ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
काल देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन अगदी दिमाखात साजरा करण्यात आला आहे. तेव्हा बॉलिवूडनंही यावेळी ध्वजारोहण केले. अभिनेत्री शिल्पा शेट्टीनंही यावेळी ध्वजारोहण केले असून तिला मात्र यावेळी ट्रोल करण्यात आले आहे.
यावेळी चप्पल घातल्यानं तिला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. एका युझरनं लिहिलं आहे की, ''काय मॅडम चप्पल घालून कोण ध्वजारोहण करतं'', तर दुसऱ्यानं लिहिलं आहे की, ''ध्वजारोहण करताना चप्पल काढावेत''.
यावरून मात्र शिल्पा शेट्टी ट्रोल झाल्यानं तिनं आपल्या सोशल मीडियावर ट्रोलर्सला चांगलचं उत्तर दिलं आहे. यावेळी तिनं म्हटलं आहे की, “ध्वज फडकवताना कोणते नियम पाळावेत हे मला माहीत आहे. माझ्या देशाबद्दल आणि तिरंग्याप्रती आदर माझ्या मनातून येतो, हे काही विचारायची गरज नाही. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे.''
ती पुढे म्हणाली की, ''आजची पोस्ट ती भावना शेअर करण्यासाठी आणि साजरी करण्यासाठी होती. सर्व ट्रोल करणार्यांनो (ज्याकडे मी सहसा दुर्लक्ष करते) या दिवशी तुम्ही तुमचे अज्ञान आणि नकारात्मकता पसरवत आहात. त्यामुळे बोलण्याआधी तथ्य तपासा''
यावेळी तिनं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि सोबतच तिनं मोजडीची चप्पल घातली आहे. त्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं. सहसा ट्रोलर्सना गांभीर्यानं न घेणारी शिल्पा यावेळी मात्र त्यांना गांभीर्यानं घेताना दिसते आहे.
यावेळी तिनं एक स्क्रीनशॉर्टही शेअर केला आहे. ज्यात चप्पल घालून ध्वजारोहण करावे की करू नये याबद्दल स्पष्ट लिहिलं आहे. हा प्रश्न Google ला विचारलेला दिसतो आहे.
सध्या यामुळे सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तिनं आपल्या आईसह आणि मुलांसह ध्वजारोहण केले होते.