Shetkari Samman Nidhi Yojana: केंद्राच्या धर्तीवर राज्यातही नमो शेतकरी महासन्मान योजना राबवली जाणार आहे. शेतक-यांना अतिरिक्त 6 हजार रुपये मिळणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले.
केंद्र सरकारची प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना शेतक-यांसाठी आहे. त्याला पूरक म्हणून राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजनेला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलेला आहे.
या योजनेला विरोध देखील होत आहे. सन्माननिधी नको शेतीमालाला वाढीव भाव द्या अशी मागणी शेतकरी करत आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या योजनेवर शिक्कामोर्तब केले.
राज्यातल्या शेतक-यांना केंद्राचे सहा हजार आणि राज्य सरकारचे सहा हजार असे एकूण 12 हजार रुपये दरवर्षी मिळणार आहेत.