Balasaheb Thackeray Quotes on Shiv Sena Foundation Day : बाळासाहेब ठाकरे यांची ठाकरी शैलीतील भाषणं कायमच मराठी भाषिकांसाठी उर्जास्त्रोत ठरली. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांचे असेच काही विचार आणि भाषणांमधली गाजलेली वक्तव्य, पाहा...
'नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे होऊ ही महत्त्वाकांक्षा बाळगा.'
'तुमच्याकडे आत्मविश्वास असेल, तर जगाच्या पाठीवर कुठेही तुम्हाला मरण नाही.'
'जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाहीत.'
'एकजुटीने राहा, जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा. तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टिकेल.'
'वयाने म्हातारे झालात तरी चालेल, पण विचाराने कधी म्हातारे होऊ नका.'
'तोंड वाजवून न्याय मिळत नसेल, तर तोंडात वाजवून न्याय मिळवा. पण, न्याय मिळालाच पाहिजे.'
'शिवसेना नसती तर, मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता. मुंबईचं नाक आपल्या हातता ठेवल्यामुळे महाराष्ट्रालासुद्धा कुणी हलवू शकत नाही.'