'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही सिरियलने ९ वर्ष पूर्ण केली आहेत. टॉप टीआरपींच्या लिस्टमध्ये अद्यापही ही सिरियल पाचव्या क्रमांकावर आहे. याच सिरियलमधील शिवांगी जोशी आणि मोहसिन खान यांनी केलेलं लेटेस्ट फोटोशूट सध्या चर्चेत आहे.
मोहसिन आणि शिवांगी यांनी हे फोटोज आपल्या सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटोज एका फोटोशूटमधील आहेत. शिवांगीने शेअर केलेल्या फोटोजवर चाहत्यांच्या अनेक कमेंट्स आल्या आहेत. ज्यामध्ये शिवांगीला चाहत्यांनी जगातील सर्वात सुंदर मुलगी म्हटलं आहे.
या फोटोजमध्ये मोहसिनने टी-शर्ट आणि ब्लेजर घातलं आहे. तर, शिवांगीने शोल्डर टॉप घातला आहे.
शिवांगी आणि मोहसिनने वेगवेगळ्या ड्रेसमध्ये पोज देत फोटोशूट केलं आहे.
फोटोजमध्ये शिवांगी आणि मोहसिन यांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये दोघांच्याही भूमिकेला प्रेक्षकांनी पसंत केलं आहे.
'ये रिश्ता क्या कहलाता है' टीव्हीवर गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. यापूर्वी यामध्ये मुख्य भूमिका अभिनेत्री हिना खान करत होती.
शिवांगी आणि मोहसिन यांचं हे फोटोशूट प्रशांत समतानीने शूट केलं आहे.
शिवांगी आणि मोहसिनचे फोटोज सोशल मीडियात खूपच व्हायरल होत आहेत. (सर्व फोटो सौजन्य: इंस्टाग्राम)