PHOTOS

छत्रपती शिवरायांनी बांधलेला किल्ले रायगड 350 वर्षांपुर्वी कसा दिसत असेल? पाहा चित्रांच्या माध्यमातून...

Raigad killa Sketches: छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा राजगडवरून रायगड ही स्वराज्याची राजधानी केली तेव्हा किल्ले रायगडवर साकार झाला भव्यदिव्य महाल. याच किल्ले रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकही झाला. आज आपल्या लाडक्या महाराजांचा 350 वा राज्याभिषेक आहे तेव्हा त्यानिमित्तानं जाणून घेऊया की तेव्हाचा रायगड नक्की कसा दिसत असेल. 

Advertisement
1/5

आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्यभिषेकदिन दिमाखात साजरा होतो आहे. त्यामुळे सर्वत्र शिवप्रेमींमध्ये या सोहळ्याचा उत्साह आहे. रायगडवर अनेक शिवभक्तांनी गर्दी केली आहे. येथे आलेल्या प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न असेल की तेव्हाचा किल्ले रायगड नक्की कसा दिसत असेल? 

(चित्र: मदन माने)

2/5
रायगड दरवाजा
रायगड दरवाजा

छत्रपती शिवरायांचा रायगड किल्ला 350 वर्षांपुर्वी कसा दिसत असेल हे भाग्य आपल्याला लाभलं असतं तर आपल्याशिवाय नशीबानं दुसरं कोणी नाही, याची प्रचिती आपल्याला आली असतीच... तो विचार जरी केला तरी आपल्या अंगावर शहारे येतात. मराठी मनातली ही इच्छा पूर्ण केली आहे कला दिग्दर्शक आणि चित्रकार मदन माने यांनी. 

(चित्र: मदन माने)

3/5
रायगड दरवाजा
रायगड दरवाजा

राजगडवरून रायगड ही राजधानी केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे मोठा राजवाडा बांधला. तेव्हाचा तो छत्रपती शिवरायांचा राजवाडा कसा दिसत असेल याची उत्तम रेखाटन विख्यात कला दिग्दर्शक आणि चित्रकार मदन माने यांनी आपल्यासमोर आणला आहे. 

(चित्र: मदन माने)

4/5
रायगड दरबार (सदर)
रायगड दरबार (सदर)

ते स्वत: कला दिग्दर्शक आहेत. त्यांनी मोठमोठ्या हिंदी आणि मराठी चित्रपटांची कला दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. 'बाजीराव मस्तानी', 'सरसेनापती हंबीरराव', 'तान्हाजी', 'मोहेनजोदारो', 'मनकर्णिका', 'बालगंधर्व' अशा अनेक चित्रपट, नाटक आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये त्यांनी कला दिग्दर्शनाचे उत्तम असे काम केले आहे. 

(चित्र: मदन माने)

5/5
शिवनेरी
शिवनेरी

रायगड साकारताना त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा, इतिहासाच्या अभ्यासाचा आणि तंत्राचा योग्य अभ्यास केला आहे. ते म्हणाले की त्यांनी हे काम त्यांनी 2017 सालापासून सुरू केले, त्यांनी रायगडाचे पहिले दृश्य तयार केले. त्यानंतर त्यांनी त्याचे दुसरे दृश्य हे लॉकडाऊनमध्ये रेखाटला. छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार, नगारखाना, दरवाजा छत्रपती शिवरायांनी त्यावेळी कसा बांधला असेल याचे रूप त्यांनी चित्राच्या माध्यमातून आपल्यासमोर आणले आहे. 

(चित्र: मदन माने)





Read More