PHOTOS

Shivrajyabhishek Din 2023 : जाणता राजा! आज 350 वा शिवराज्याभिषेक दिन; अभिमानानं द्या 'या' शुभेच्छा

आज तिथीप्रमाणे तर 6 जूनला तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. रायगडावर गडदेवता म्हणजे शिर्काई देवीच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ज्यानंतर राज्याभिषेकासाठी ज्या चांदीच्या पालखीचा वापर केला जाणार आहे त्या पालखीचंही पूजन करण्यात आलं. आजच्या दिवशी जगदीश्वराचंही मंत्रोच्चारात शास्त्रोक्त पध्दतीनं पूजन करण्यात आलं. ऐतिहासिक नंदीच्या दगडी मुर्तीवर तब्बल साडेतीनशे वर्षांनंतर पितळेचा मुखवटा बसवला गेला. (Shivrajyabhishek din sohala 2023 Raigad wishesh and greetings and photos )

Advertisement
1/8
राज्याभिषेक
राज्याभिषेक

Shivrajyabhishek Din 2023 : महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी गागाभट्ट यांचे सतरावे वंशज महंत सुधीर दास महाराज हा विधी करणार आहेत. या कार्यक्रमला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशा या खास आणि तितक्याच अभिमानास्पद दिवसाच्या शुभेच्छा तुम्हीही शिवप्रेमींना आणि आप्तजनांना द्या. कारण, राजे होते म्हणून आज आपणही आहोत... तेव्हा त्यांना मानाचा मुजरा करायलाच हवा. 

2/8
निश्चयाचा महामेरू
निश्चयाचा महामेरू

''निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी।। नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती। पुरंदर आणि शक्ति, पृष्ठभागी।। यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत वरदवंत। पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा।।'' शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!

 

3/8
जीव रक्षितो ऐसा राजा
जीव रक्षितो ऐसा राजा

''माती साठी प्राण सांडतो युद्ध मांडीतो ऐसा राजा जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा'' शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!

 

4/8
प्रभो शिवाजीराजा
प्रभो शिवाजीराजा

‘हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा…’ शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!

 

5/8
क्षत्रियकुलावतंस
क्षत्रियकुलावतंस

''प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!!'' शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा

 

6/8
हिंदवी स्वराज्य
हिंदवी स्वराज्य

''होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा, थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!''

 

7/8
शिवछत्रपतींच्या आठवणींना देऊ आज उजाळा
शिवछत्रपतींच्या आठवणींना देऊ आज उजाळा

''न भूतो न भविष्यति असा होता  आपल्या राजाचा शिवराज्याभिषेक सोहळा या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी  शिवभक्त झाले होते गोळा या ऐतिहासिक दिनाच्या एकमेकांस शुभेच्छा देऊन शिवछत्रपतींच्या आठवणींना देऊ आज उजाळा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा!''

 

8/8
गर्व मराठ्यांचा
गर्व मराठ्यांचा

''सिहांसनी होतो आरूढ गर्व मराठ्यांचा मुजरा तुजला आमचा प्रभो शिवाजी राजा शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!''

 





Read More