PHOTOS

बर्फाच्छादित शिमल्यातून संजय राऊत म्हणाले Happy new year; पाहा Photos

New Year 2025 : नेतेमंडळीसुद्धा यात मागे राहिलेली नाहीत. संजय राऊत हेसुद्धा याच नेत्यांच्या यादीतील एक नाव. 

Advertisement
1/7
सुट्ट्या
सुट्ट्या

New Year 2025 : वर्षअखेर, सुट्ट्या आणि थंडीचा माहोल अशा एकंदर वातावरणात अनेकांचेच पाय वळतात ते म्हणजे काही कमाल पर्यटनस्थळांकडे. 

 

2/7
गिरिस्थानं
गिरिस्थानं

भारतातील अनेक गिरिस्थानं पर्यटकांनी तुडूंब भरलेली असतानाच नेतेमंडळींनाही भटकंतीचा मोह आवरला नसून, त्यांनीही सुट्टीचं निमित्त साधत अशीच काही ठिकाणं गाठली आहेत. 

3/7
संजय राऊत
संजय राऊत

ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊतही अशाच एका सफरीवर गेले असून, राजकारण, बातम्या या साऱ्यापासून ते काहीसे दूर असल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

4/7
हिमाचल प्रदेशा
 हिमाचल प्रदेशा

राऊतांनी सुट्ट्यांच्या या दिवसांमध्ये प्राधन्य दिलं आहे ते म्हणजे हिमाचल प्रदेशातील शिमल्याला. बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि शिमल्याचा निसर्ग पाहून फोटो शेअर करण्याचा मोह राऊतांना आवरलेला नाही हेच पाहायला मिळतंय. 

 

5/7
शुभ्र बर्फ
शुभ्र बर्फ

आजूबाजूला असणारा शुभ्र बर्फ, उंचच उंच देवदार वृक्ष असे काही फोटो राऊतांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

6/7
शिमला
शिमला

सुट्टीच्या निमित्तानं शिमला सफरीवर असणाऱ्या राऊतांनी यावेळी देश तसा वेश, असाच लूक करत या थंड हवेच्या ठिकाणी तसा पेहरावही केला आहे. त्यामुळं राऊतांच्या या पेहरावालाही कमाल पसंती मिळताना दिसत आहे. 

7/7

(छाया सौजन्य- संजय राऊत/ X)

 





Read More