PHOTOS

शोलेला 50 वर्षे पूर्ण; अमिताभ बच्चन नव्हे तर 'या' अभिनेत्याला मिळालेले सर्वाधिक मानधन

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक 'शोले', दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्या दिग्दर्शनाखाली 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झाला. दिग्गज कलाकारांचा समावेश असलेला हा चित्रपट या वर्षी सुवर्णमहोत्सवी म्हणजेच 50 वर्षांचा होत आहे. 

Advertisement
1/9

sholey movie payments: पाच दशकांमध्ये बरेच काही बदलले, त्या काळातील तरुण कलाकार आज दिग्गज बनले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, 'शोले'च्या कलाकारांना त्यावेळी किती मानधन देण्यात आले होते? विशेष म्हणजे, वीरूची भूमिका साकारणारे धर्मेंद्र हे सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन, संजीव कुमार, हेमा मालिनी, जया भादुरी आणि अमजद खान असे मोठे कलाकार असूनसुद्धा, त्यांच्या मानधनाची रक्कम आजच्या तुलनेत खूपच कमी होती.

2/9
धर्मेंद्र
धर्मेंद्र

1970 च्या दशकात धर्मेंद्र आधीच सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्टार्समध्ये होते. शोलेमधील वीरूच्या भूमिकेसाठी त्यांना 1.5 लाख रुपये मानधन मिळाले.

3/9
संजीव कुमार
संजीव कुमार

ठाकूर बलदेव सिंगच्या भूमिकेसाठी संजीव कुमार यांना 1.25 लाख रुपये मानधन देण्यात आले, जे चित्रपटातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मानधन होते.

4/9
अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन

त्या काळात स्टारडमच्या मार्गावर असलेल्या अमिताभ बच्चन यांनी जयची भूमिका साकारली आणि त्यासाठी त्यांना 1 लाख रुपये मिळाले.

 

5/9
अमजद खान
अमजद खान

गब्बर सिंगची आयकॉनिक भूमिका साकारणाऱ्या अमजद खान यांना 50000 रुपये मानधन मिळाले. ही भूमिका त्यांच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरली.

6/9
हेमा मालिनी
हेमा मालिनी

बसंतीच्या भूमिकेसाठी हेमा मालिनी यांना 75000 रुपये मानधन देण्यात आले.

 

7/9
जया बच्चन
जया बच्चन

राधा या विधवेच्या भूमिकेसाठी जया बच्चन यांना 35000 रुपये मिळाले, जे मुख्य कलाकारांमध्ये सर्वात कमी मानधन होते.

8/9

सर्व प्रमुख कलाकारांचे एकत्रित मानधन फक्त 5 लाख 50 हजार रुपये होते. सहाय्यक कलाकारांमध्ये मॅक मोहन (सांबा) यांना 12000, विजू खोटे (कालिया) यांना 10000 आणि ए.के. हंगल (इमाम साहेब) यांना 8000 रुपये मिळाले.

9/9

कमी बजेटमध्ये उत्कृष्ट कलाकारांची निवड करून तयार झालेला 'शोले' आजही भारतीय सिनेमातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या आणि लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे.





Read More