झी मराठीवरील 'तुला जपणार आहे' या मालिकेतील अभिनेत्री महिमा म्हात्रेने शुटिंगदरम्यानचे काही खास क्षण शेअर केले आहेत. तिने घुंगट घेऊन प्रचंड उकाड्यात शुटिंग करताना आलेल्या अनुभवांबद्दल सांगितले आहे. जाणून घेऊया त्या क्षणी नेमकं काय घडलं होतं.
मालिकांमध्ये काहीतरी वेगळं आणि स्टोरीच्या डिमांड प्रमाणे कलाकारांना शूट करावे लागत. कधी कोणाला नववारी मध्ये घोडेस्वारी, तर कधी कोणाला तांडव, आणि हल्लीच बोलायचं झालं तर 'तुला जपणार आहे' मालिकेत लग्नसोहळा संपन्न झाला.
ज्यात नवरी पूर्ण लग्नात घुंगट घेऊन होती. हा सीन मीराची भूमिका साकारत असलेल्या महिमा म्हात्रे ने शूट केला. महिमानं आपला अनुभव व्यक्त करताना सांगितले 'घुंघट घेऊन शूट करण्याचा अनुभव वेगळाच होता कारण मी पहिल्यांदाच असं काही शूट केलं.'
'आम्हाला मीराचा चेहरा रिव्हिल करायचा नव्हता. हे बिलकुल सोपं नव्हतं कारण त्या कॉस्ट्यूम मध्ये प्रचंड गरम होत होत. साडी, शेला, खुप दागिने, मग घुंघट, त्यावर वरमाला, आम्हाला हा लग्न सीन शूट करायला आठवडा गेला आणि पूर्ण शूटच्या काळात माझी हीच वेशभूषा होती.'
'आठवडाभर घुंघट आणि गर्मीत शूट करून माझ्या अंगावरती रॅशेसही आले. पण हा अनुभव माझ्यासाठी वेगळा होता. घुंघटच्या आत दिलेले रिएक्शन ते शूट करतानाची मज्जा वेगळीच होती कारण कॅमेरा घुंघटच्या आतून घेऊन शूट करायचं होत.'
'लाईट्समुळे इतकं गरम होत होते कि घामाच्या धारा लागल्या होत्या. तरीही खूप छानपणे आम्ही शूट केले. आता जेव्हा प्रेक्षकांचा रिस्पॉन्स आणि प्रेम पाहून असं वाटतंय माझ्या मेहेनतीच चीझ झालं.' ह्या सीनच्या मागची गोष्ट अशी की मीरा मायाच्या खऱ्या हेतूचा आणि तिचा वेदावर असलेल्या रागाचा पर्दाफाश करते.
मीराला समजलंय की माया हे लग्न फक्त सूड घेण्यासाठी करतेय. दरम्यान शिवनाथ अंबिकाला एक नवी शक्ती प्रदान करतो, जी तिला मानसिक बळ आणि शांती देते. मीरा एका सापळ्यात अडकते, पण अंबिका वेळेत तिच्या मदतीला धावते आणि त्यातून तिला सुरक्षितपणे बाहेर काढते.
मीरा आणि अंबिका एकत्र घरात प्रवेश करताना तब्बल वर्षभरानंतर गप्प असलेली वेदा पहिल्यांदा बोलणार आहे. एक असा गृहप्रवेश जो मंजिरीच्या अधोगतीची सुरुवात ठरणार असल्याचं पूर्वीच भाकीत झालं होतं.
तेव्हा बघायला विसरू नका 2 तासांचा लग्नसोहोळा विशेष भाग 'तुला जपणार आहे' रविवार 8 जून दुपारी2 आणि रात्री 9 वा. फक्त झी मराठीवर.