श्रावण या महिन्यात शिव आणि पार्वतीची पुजा केली जाते. म्हणूनच महाराष्ट्रातील काही प्रचीन शिवमंदिरांची माहिती जाणून घेऊयात.
दीप अमावस्या झाल्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते. श्रावण हा सणांचा महिना म्हणून देखील ओळखला जातो. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी श्रावणात सर्वात जास्त व्रत वैकल्य केले जातात. असं म्हणतात की श्रावण महिना भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे.
लोकल आणि ट्राफिकच्या गोंगाटापासून अलिप्त असलेलं वाळकेश्वरचं बाबुलनाथ मंदिर हे मायानगरी मुंबईतील सर्वात जुनं मंदिर आहे. 350 वर्ष जुनं हे शिवमंदिर मुंबईतील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे.या मंदिराविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की, हे शिवलिंग बाभूळाच्या झाडाच्या सावलीत एका गुराख्याला दिसले होते. त्यामुळे या मंदिराला बाबुलनाथ हे नाव देण्यात आहे.श्रावण सोमवार आणि इतर दिवशीही शिवभक्त या ठिकाणी ध्यान करण्यासाठी येत असतात.
हापूस आंब्यासोबतच देवगडची आणखी ओळख सांगणारं तीर्थक्षेत्र म्हणजे कुणकेश्वर शिवमंदिर. गाभाऱ्यातील शिवलींग हे शिवलींग स्वयंभू असल्याचं सांगितलं जातं. या मंदिराचं वैशिष्ट्यं म्हणजे ओहोटीच्या वेळी किनाऱ्यावर 21 शिवलिंगाचं दर्शन होतं. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पाच पांडवांनी देवगडच्या किनाऱ्यावर 21शिवलिंगाची स्थापना केली.अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या ठिकाणाला कोकणातील काशी म्हटलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी या गावात मोठा उत्सव साजरा करण्यात येतो.
हेमाडपंथी शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणजे कल्याण जवळील खिडकाळेश्वर शिवमंदिर. शिवकाळाचा इतिहास सांगणाऱ्या ऐतिहासिक कल्याणमधील खिडकाळेश्वर मंदिराला शिवभक्त मोठ्या प्रमाणात भेट देतात. मंदिरपरिरसरात अनेक पक्ष्यांचं दर्शन होतं, त्यामुळे याठिकाणाला पक्षीतज्ञ आवर्जून भेट देतात. महादेवांच्या दर्शनासाठी श्रावणी सोमवारी भाविक श्रद्धेने येतात.
रत्नागिरीच्या डोंगरावर वसलेला मारळ गावचा देव म्हणून मार्लेश्लर अशी येथील मंदिराची ओळख आहे. दिवेलागणीच्या वेळी मंदिर परिसरात लावण्यात येणाऱ्या दिपमाळांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण होतं. पावसाळ्यात मार्लेश्वर परिसरात असलेल्या धबधब्यांचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात मार्लेश्वराला भेट देतात.
पुण्यातील शनिवार पेठेत पेशव्यांच्या काळातील हे प्राचीन शिवमंदिर आहे. मुळा मुठा नदीच्या जवळ असलेल्या या मंदिरात श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी असते. चिमाजी आप्पांच्या देखरेखीखाली बांधण्यात आलेल्या या नऊ कळस असलेल्या मंदिराची शिल्पकला विलोभनीय आहे.
हिंदू पुराणानुसार असं सांगितलं जातं की, गौतम ऋषिंनी गोदावरी नदीच्या किनारी तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले.म्हणूनच श्रावणात शिवभक्त आणि तपस्वी मोठ्या भक्ती भावाने येत असतात.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं पुण्यातील भीमाशंकर हे देवस्थाला देशातील 12 ज्योतिर्लिगांपैकी एक आहे. या ठिकाणी महादेवाची सर्वात मोठी पिंड असल्याने याला मोटेश्वर असंही म्हणतात. हेमाडपंथी शिल्पकलेतील या मंदिराची रचना आहे. 1200 वर्ष जुनं असलेल्या या मंदिरावरील शिल्पकला मोहित करतात. महादेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवभक्त भीमाशंकरला भाविक श्रद्धेने येतात.
छत्रपती शिवरायांचे आजोबा यांनी सोळाव्या शतकात जीर्णोद्धार केला. या मंदिराची सुबक शिल्पकला मन वेधून घेते. महाशिवरात्री आणि श्रावण सोमवारी येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो.